
✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260
नांदेड(दि.8फेब्रुवारी):- क्रांतिसुर्याची सावली आई रमाई.
महासुर्याची सावली होऊनी आयुष्यभर कष्ट सोसत चंदनापरी झिजणाऱ्या, अथांग हाल अपेष्टा सहन करीत कोट्यावधी शोषित-पीडित दिनदुबळ्यांसाठी मायेची सावली बनलेल्या मातेचा जयंतीदिन सोहळा आज बरबड़ा नगरित मोठ्या सहर्षात व उत्साहत साजरा आणि करण्यात आला. रमाई महिला जयंती मंडळाच्यां वतीने दरवर्षी जयंती मोठया थाटामाटात साजरी केल्या जाते.
यावर्षी सुद्धा ही जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम पंचशील ध्वजारोहन *सौ.अंजनाताई बालाजी मदेवाड (पंचायत समिती सदस्या)* व *कु.पूजाताई पांडुरंग एडके ( ग्राम पंचायत सदस्या)* यांच्या हस्ते करण्यात आले।
या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र बरबड़ा येथील आशा स्वयंसेवीका पूर्ण स्टाफ व ग्रामपंचायत बरबड़ा येतील संपूर्ण स्वछता कर्मचारी महिला उपस्थित होत्या त्या सर्वांचा रमाई जयंती मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्ह्णून नांदेड़ येथील आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज, तरुण तडफदार युवा नेते तरुणांचे आधारस्तंभ *मा.राहुलभाऊ सोंनसळे* ,मा.राहुलभाऊ घोडजकर ,मा.विकास भाऊ धोत्रे ,सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे अभय सोनकांबळे व मित्र परिवार आदी उपस्थित होता त्या सर्वांचा रमाई जयंती मंडळ व संघर्ष ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला उपस्थिती दाखविल्याबद्दल सर्वांचे रमाई जयंत मंडळ व संघर्ष ग्रुपच्या वतीने जाहीर आभार.