किनगाव प्रहार जनशक्ती पक्षाचा वतीने किनगाव कोपरा पांदन रस्ता खडीकरण मंजुर करण्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांना निवेदन

24

✒️शुभम बेद्रे(विशेष प्रतिनिधी)

किनगाव(दि.8फेब्रुवारी):- किनगाव कोपरा पांदन रस्ता गेली चाळीस वर्षांपासुन अतिक्रमणा मध्ये अडकलेला होता लोकसहभागातून माती काम पूर्ण झाले आहे,शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी व माल वाहतुकीसाठी रस्ता राहिलेला नव्हता, प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले व राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बस्वराज हुडगे यांच्या माध्यमातून शेतकरी लोकसहभागातून पैसे जमा करून आणि किनगाव नगरीचे सरपंच मा श्री किशोर बापु मुंढे साहेब यांच्या सहकार्यातुन योग्य मार्गदर्शनातुन रस्त्याचे मातीकाम दोन वर्ष झाले पुर्ण झाले आहे.

तरी खडीकरणासाठी अहमदपूर विधानसभा मतदारसंघ आमदार मा ना बाबासाहेब पाटील साहेब यांना निवेदन व प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल करण्यात आला आहे.प्रस्ताव दाखल करताना, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष बाळू आमले, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बस्वराज हुडगे, प्रहार शाखा अध्यक्ष योगेश आमले (माळी), उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले, दामोधर धरणे व इतर प्रहार कार्यकर्ते आदी उपस्थित होते.