शेळगांव (गौरी) च्या सरंपच पदी प्रा.मनोहर तोटरे तर उपसरपंचपदी सौ,शालीनीताई पाटील याची निवड

✒️देगलूर विशेष प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देलगुर(दि.9फेब्रुवारी):-आदर्श गांव शेळगांव गौरी ता.नायगांव येथे आज निवडणूक विभागातील निवडणूक अधिकरी बि,एच.फुफाटे. यानी आज दि.8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9 वाजता या प्रक्रियेला सुरुवात केली परिवर्तन विकास पँनल कडुन सरपंच पदासाठी प्रा.डाँ.मनोहर तोटरे.तर ग्रामविकास पँनल कडुन सौ.शालाबाई तुकाराम वाघमारे यानी उमेदवारी आर्ज घेतला तर यात प्रा तोटरे सर याना 6 तर सौ.शालाताई वाघमारे याना 3 मते प्राप्त झाले.

उपसरपंच पदासाठी परिवर्तन विकास पँनल कडून सौ शालीनीताई राजेन्द्र पाटील तर ग्रामविकास पँनल कडुन केशवं आत्माराम पा.शिंपाळे यांनी आर्ज दाखल केला तर सौ.शालीनीताई पाटील याना 5 तर केशव आत्माराम पा. शिंपाळे याना 4 मते प्राप्त झाले. यावेळी तलाठी विजय पा,जाधव.ग्रामसचिव धनराज केत्ते.तर बिट जमादार चंद्रकांत चाटे.प्रल्हाद कोरके. हे उपस्थित होते.

तर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य प्रा.समदानी सय्यद.माजी सैनिक मोहन मेडाबलमेवार.सौ.सगिता कांबळे.सौ.सुमित्राबाई आशोकराव बावणे.सौ.आशाबाई इबितदार.सौ.शालाबाई तुकाराम वाघमारे,केशव आत्माराम पा.शिंपाळे हे उपस्थित होते.

शेळगांव गौरी येथे प्रथमच तरुण व कुशल नेतृत्व म्हणून प्रा.डा़ँ.मनोहर तोटरे सर हे सरपंच झाल्याबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिक पडिंतराव पाटील.रावसाहेब पा.शिंपाळे.नागनथ पा.शिंपाळे,सुधाकर पाटील.मधुकर पाटील.भाऊसाहेब पाटील.राजेन्द्र विठ्ठलराव पाटील,संतोष देशमुख.शेषेराव पा.शिंपाळे.निवृत्ती वाघमारे.दिपक कल्लेपवार.सतिश गोस्वामी.माधव पा.वाढवणे.बबन काठेवाडे.पिराजी घोरपडे.बालासाहेब मेडाबलमेवार. सुनिल रामदासी.तानाजी वाघमारे. आदि प्रमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED