जिल्हा कोषागारात लेखा व कोषागारे दिन उत्साहात साजरा

32

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलडाणा(दि.9फेब्रुवारी):-जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा व कोषागारे दिनाचा कार्यक्रम 1 फेब्रुवारी 2021 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून से. नि. मुख्य वित्त व लेखाधिकारी ताठे, जिल्हा परिषद वित्त विभागाचे लेखाधिकारी श्री. चव्हाण, जि.पच्या शालेय पोषण आहारचे लेखाधिकारी श्री. दिवनाले, लेखापरीक्षा अधिकारी श्री. चिंचोळकर, कृषि विभागाचे लेखाधिकारी श्री. आराख, ग्राहक न्याय मंचचे लेखाधिकारी श्री. पाटील, वेतन पथकचे लेखाधिकारी श्री. साबळे, सर्व शिक्षा अभियानचे सहा. लेखाधिकारी रितेश पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहा. लेखाधिकारी श्री. राजपूत,समाज कल्याण विभागाचे सहा. लेखाधिकारी श्री. गोटीवाले, वेतन पथकचे सहा लेखाधिकारी श्री. तायडे, अप्पर कोषागार अधिकारी श्री. मांडोगडे, श्री. अंभोरे, श्रीमती तिमसे आदींची उपस्थिती होती.

यावेळी कोरोना महामारीच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात आले. सुरुवातील कृषी विभाग वाशिमचे लेखाअधिकारी स्व.शाम गाभने यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम परितोषिक कु. मयुरी लेकुरवाळे, द्वितीय पारितोषिक दुर्गा चव्हाण व तृतीय पोरितोषिक श्रीमती साधना माटे यांना देण्यात आले.

तर कोरोना विषयावरील निबंध स्पर्धेचे प्रथम पारितोषिक श्रीमती मिना गोटीवाले, द्वितीय पारितोषिक दुर्गा चव्हाण यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी आपले विचार व्यक्त करीत लेखा व कोषागारे विभागाचे महत्व विषद केले. संचलन श्री. भोलाने यांनी, तर आभार प्रदर्शन श्री. हेलोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा कोषागार कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे