खानगांव येथील इसमावर अस्वलाचा प्राणघातक हल्ला

31

✒️विनोद उमरे(विशेष प्रतिनिधी)मो:-8766921326

शेगाव(दि.10फेब्रुवारी):- खानगांव येथील रहिवासी रामदास रामा चौखे वय ५५ वर्ष हे आपल्या स्वताच्या मालकीच्या शेतामध्ये हरभरा पिकांची राखण करण्याकरीता जागली जात असताना अचानक त्यांच्यावर अस्वलांनी हल्ला करुन त्यांना जखमी केले.खानगाव येथील रामदास रामा चौखे हे नेहमी प्रमाणे रात्री ८.३०.ते ९ वा. दरम्यान घरुन जेवण करून जागली जात होते व अचानक समोरून जंगलांच्या दिशेने येणाच्या अस्वलानी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

त्यांनी आरडा-ओरड चालू केले व त्याच्या शेताच्या सभोवतालचे संपूर्ण शेतकरी यांच्या मदतीला धावून गेले आणि त्या सर्व शेतकरी यांनी गावकऱ्यांना फोन करून सुचविले व गावकण्यानी घटनेच्या दिशेने लगेच धाव घेऊन हि माहिती फाॅरेस्टच्या ढोके मॅडम याना या सर्व माहिती दिली. ढोके मॅडमनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन दवाखान्यात हलविण्याचे सांगितले चिमूर येथे सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. सरकारी दवाखान्यांमध्ये प्रथम उपचार करून त्यांना डॉक्टरांनी रेफरल करून नागपूरला हलविण्याचे सांगितले व आता त्यांच्यावर नागपूर येथे उपचार चालू आहे.