चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास ब्रम्हपुरी तालुका ग्रामीण पत्रकार संघाचा विरोध

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.10फेब्रुवारी):- चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूर मध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील गावाचा समावेश करण्यात आला आहे , ज्याला आक्षेप आहे असे वाटते त्यांनी आपल्या हरकती जिल्हाधिकारी यांचे कडे पाठवून आक्षेप नोंदणी करावी असे जाहीर केले आहे, त्या अनुषंगाने ब्रम्हपुरी तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध आक्षेप अर्ज उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांचे मार्फत मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर, मा.मुख्यमंत्री, मा.उप मुख्यमंत्री,मा. पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर , यांना देण्यात आले. यावेळी ब्रम्हपुरी तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद चौधरी , सचिन बदन , उपेंद्र बोरुले, प्रशांत डांगे,संजय पगाडे, गुरुदेव वाघरे ,रवी चामलवार दत्तात्रय दलाल ,उत्तम लोखंडे उपस्थित होते .

रक्तदान शिबिर संपन्न .ज्येष्ठ समाजसेविका, तथा, आम आदमी पार्टीच्या राज्य सदस्य नेत्या, अॅड. पारोमिता गोस्वामी, यांच्या वाढदिवसानिमित्त,संपदा, अर्बन निधी लिमिटेड बँक ब्रम्हपुरी, व, हितआयु लोकसेवा बहुउद्देशीय संस्था, ब्रम्हपुरीच्या संयुक्त विद्यमाने, रक्तदान शिबिराचे आयोजन, दिनांक 9 फेब्रुवारी ला, ख्रिस्तानंद रुग्णालय येथे, करण्यात आले होते यात रक्त दात्यांनी रक्त दान केले यावेळी ad. पारोमिता गोस्वामी ,आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्धावर , दिनेश घाटे, गौरव शामकुले , अमित राउत, विनोद चौधरी , प्रशांत डांगे, किशोर प्रधान , उपेंद्र बोरुले ,संजय पगाडे , उत्तम लोखंडे, स्वप्नील अलगदेवे ,ढोरे उपस्थित होते .