ग्राहकांची लूट आणि फक्त लूट

29

आज सर्वत्र बाजार माॅल इत्यादी एम आर पी वर डिस्काउंट. एकावर एक मोफत. अशा ऑफरसनी ग्राहकांना जास्त भुरळ घातली आहे अगदी एक साबनाची वडी, चहा तेल. खरेदी करणारा ग्राहक सुध्दा सर्वात जास्त डिस्काउंट हेच पाहत असतो कसे काय दिले जातात डिस्काउंट ? एवढे द्यायला कंपनीला कसे काय परवडतय?. हे व्यापारी नुकसानीत धंदा करतात काय ? एवढा डिस्काउंट देणारे पण आज भारतातील सर्वात श्रीमंत यादित कसे ? असा प्रश्न आपणास कधी पडतो का ?
कृपया सर्वप्रथम हे ध्यानात घ्या कि ग्राहकांना उदार होऊन डिस्काउंट देणारे या व्यक्ती कोणी समाजसेवक अथवा धर्मादाय संस्था नाहीत या सर्व योजना म्हणजे धनिक लोकांनी सुरू केलेला भुलभुलया असून एम आर पी रूलमधील पळवाट आहे याचा गैरफायदा घेऊन डिस्काउंट चे नावाखाली ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक करुन त्याची फसवणूक केली जात आहे हा प्रकार गेल्या बर्याच वर्षांपासून सुरु असून डिस्काउंट चे नावाखाली ग्राहकांना दरवर्षी सर्वे नुसार पुढे आलेली अंदाजे रक्कम तीन लाख कोटी असावी आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर हा सर्वात मोठा घोटाळा असून त्याबाबतची माहिती आपण जाणून घेणे गरजेचे आहे.

१९९२ साली तत्कालीन सरकारने मुक्त आर्थिक धोरणांचा स्विकार केला किरकोळ बाजारात काही प्रमाणात मोठ्या व्यापारी वर्गाचा उद्योगपती व धनिकांनी प्रवेश केला देशातील प्रमुख आणि मोठया शहरात मोठी चकाचक दुकाने सुरू करून अशा लूटीला सुरवात झाली परंतु सर्वसामान्य ग्राहक या मोठ्या दुकानाकडे पाट फिरवली काही मोठी दुकाने बंद पडली तरी काही महाभाग आपले नशीब आजमावूने सोडले नाही आणि पुन्हा ते मार्केट मध्ये दाखल झाले.साधारण वीसेक वर्षांपूर्वी सुपर मार्केट चेन तयार करण्यात आली आणि फेस्टिव्हलमध्ये त्यांनी एम आर पी रुलमधील पळवाटाचा गैरफायदा घेऊन fmgc क्षेत्रातील काही उत्पादकांकडून त्यांच्या उत्पादनाचे मोठे मोठे पॅक स्पेशल किंमती टाकून बनवून घेतलें व वृतमानपत्र यातून मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या हि त्यांची युक्ति इतकी प्रभावशाली ठरली आणि ग्राहकाची डिस्काउंट मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी झाली त्या चार दिवसांत आजुबाजुला असणारे बाजार माॅल यांची परिसरातील वाहतूक यंत्रणा कोलमडून पडली अशा प्रकारे या धनिकाना ग्राहकांना लुबडणयाचा या नविन गोरखधंदयाचा शोध लागला हि फसवणूक अगदी चाणाकक्षपणे कोणताही कायदा न मोडता केली जाते याचे साधे सोपे उदाहरण देतो.

एम आर पी रुल ऑक्ट ( इंडिया मेटरोलाॅजी ) हा कायदा येण्यापूर्वी कोणत्याही वस्तूची व उत्पादनाची किंमत छापलेली नसायची त्यामुळे एकच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कीमतीला विकली जायची त्यात ग्राहकाची मोठ्या प्रमाणात फसवणूक व अडवनूक होत होती. त्यामुळे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करून त्याची फसवणूक होऊ नये म्हणून १९७६ साली देशात एम आर पी रूल लागू करण्यात आला व १९९० साली या कायद्यात काही किरकोळ सुधारणा करण्यात आल्या या कायद्यानुसार उत्पादकांना त्यांच्या उत्पादनावर विक्री अधिकतम किंमत एम आर पी छापणे बंधनकारक करण्यात आले कीमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास विक्री करणार्या वर गुन्हा दाखल करून त्यांना जबरी दंड व शिक्षा तरतूद करण्यात आली आहे.

सर्वात मोठी लूट आज औषध व मेडिकल विक्री भरमसाठ किमती छापण्यास मुभा असलेमुळे वैद्यकीय ठिकाणी चालणारी लूट. काही औषधांवर काही पटिने किंमती छापून सदर कंपनी त्याची औषध रुग्णांस लिहून देणे साठी डाॅ लोकांना काही अमिष दाखवतात काही डॉ या अमिषाला बळी पडून रुग्णांना उपयोगी नसणारी सुध्दा औषधे केवळ कमिशन साठी लिहून देतात एका बाजूने हे औषध आत येते आणि नंतर सरळ मेडिकल मध्ये मागे जाते आणि अशा डॉ मुळे पेशंट चे नातेवाईक खड्ड्यात जातात.
8८%काही डॉ. मेडिकल वाल्यांनी संगनमत करून रुग्णांना अशी औषधे लिहून देतात की डाॅ यांनी सांगितलेल्या मेडिकल दुकानातच सदर औषध उपलब्ध असतात या औषधांवर अनेक पटिने किंमती छापलेल्या असतात.

हा तर सर्वात मोठा प्रश्न आहे अनेक दवाखान्यात औषधांची मेडिकल दुकाने सुरू केली आहेत काही ठिकाणी अधिक नफा मिळवण्यासाठी रुग्णांना गरज नसणारे औषधे दिली जातात भरमसाठ किमती छापण्यास सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राता सर्वसामान्य जनतेला लूटले जाते दुर्दैवाने एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एकादा पेशंट कोणाला अपघात किंवा गंभीर आजार झाला तर औषधं उपचारासाठी त्याची सर्व पूंजी बचत दागदागिने व सर्व मालमत्ता जाऊन भिकेला लागतो तरी त्याला डॉ कडून मेडिकलच्या माध्यमातून होणारि लूट थांबवावी अशी डॉ लोकांची इच्छा होत नाही पेशंट मृत्यू झाला तरी औषध आणा सांगितले जाते पेशंटला बघू अथवा भेटू दिले जात नाही यासाठी जर औषधांवर योग्य किमती छापल्या गेल्या तर सदर अपप्रवृत्ती काही प्रमाणात कमी होऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील.

वैद्यकीय क्षेत्रातात लिहण्यासाठी बरेच काही आहे दवाखान्यात नागरि सनद. उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार. औषध दुकान निवडणे. आपल्याला दवाखाना निवडण्याचा अधिकार. आरोग्य योजनेची माहिती. योजना कोणत्या आजारांवर कीती शासन अनुदान किती योजनेत न बसण्याची कारणे आत्ता रेशन कोणतेही असूद्या उपचार घेणाऱ्या व्यक्तिचे नाव रेशनकार्ड मध्ये असणे आवश्यक आहे हे आपणास माहीत असणे गरजेचे आहे

✒️लेखक:-अहमद नबीलाल मुंडे ९८९०८२५८५९
संस्थापक अध्यक्ष रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा.