सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर लोखंडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षात घेतला प्रवेश

28

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.11फेब्रुवारी):-अनेक वर्षापासून शेतकरी आंदोलनात हिरीरीने भाग घेणारे सांगोला तालुक्याची शान सांगोला तालुक्यातील रुग्णसेवक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर रान उठवणारे युवक, अपंग निराधार परितक्त्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठवणारे युवक नेते मा. ज्ञानेश्वर बाळू लोखंडे बुरलेवाडीचे सुपुत्र यांनी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र संपर्कप्रमुख रामदास खोत साहेब जिल्हाध्यक्ष मा.दत्ताभाऊ मस्के व युवा जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षात मंगळवेढा शासकीय विश्रामग्रह येथे प्रवेश केला.त्यांची सांगोला तालुका युवाअध्यक्ष पदी जिल्हाध्यक्ष मा.दत्तात्रय मस्के पाटील यांनी निवड केली,पुढील आयुष्य वंदनीय बच्चुभाऊ यांच्या सोबत शेतकरी शेतमजूर अपंग निराधार यांचा आधार बनून त्यांच्या सेवेत घालवेल असे यावेळी लोखंडे यांनी सांगितले,दत्ताभाऊंनी गेल्या काही वर्षातील कामाचा सन्मान करून मला प्रहार संघटनेत प्रवेश दिला व समाजातील दुर्लक्षित घटकांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा हृदय पुर्वक आभारी आहे असे लोखंडे म्हणाले.

मी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सोलापूर जिल्ह्यासह माझ्या सांगोला तालुक्यात गाव तिथे शाखा निर्माण करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन असे लोखंडे म्हणाले.संपूर्ण महाराष्ट्रासाठी आयडॉल असलेले आमचे वंदनीय बच्चुभाऊ कडू हे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातील युवकांना खुणावत असून येत्या काही महिन्याच्या काळात सोलापूर जिल्ह्यात प्रहार संघटना ही घराघरात पोहोचलेली असेल, असे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा समन्वयक मा.नाविद पठाण, युवाजिल्हाध्यक्ष प्रा.संतोष पवार, जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील,जिल्हा उपाध्यक्ष सिद्राया माळी, तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे प्रहार शेतकरी संघटनेने मंगळवेढा तालुका अध्यक्ष सचिन गरांडे, सांगोला अपंग क्रांतीचे तालुका अध्यक्ष सतीश दिडवाघ, करमाळा चे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर,पंढरपूरचे मा.तालुकाध्यक्ष गणेश लामकाने, शहराध्यक्ष आनंद गुंगे,शहर संपर्क प्रमुख शकील खाटीक, सुधीर हजारे, मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष आरोग्यसेवक राकेश पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, महिलाध्यक्षा अश्विनी पाटील अपंग क्रांतीचे तसेच प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते व त्याचबरोबर अनेक प्रहार सैनिक महिला भगिनी उपस्थित होत्या.