चंद्रपूर जिल्ह्यात (दि.11फेब्रुवारी) रोजी 24 तासात 19 कोरोनामुक्त 15 कोरोना पॉझिटिव्ह – एक कोरोना बधिताचा मृत्यू

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.11फेब्रुवारी):-जिल्ह्यात मागील 24 तासात 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 15 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 23 हजार 175 झाली असून त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 700 झाली आहे. सध्या 82 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख पाच हजार 148 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 80 हजार 121 नमुने निगेटीव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यांमध्ये माजरी ता. भद्रावती येथील 80 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 393 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 355, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 15 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील पाच, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपुर एक, भद्रावती एक, ब्रम्हपुरी एक, नागभिड दोन, गोंडपिपरी दोन, राजुरा एक व कोरपना येथील एका रुग्णांचा समावेश आहे.कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.