समाजरत्न संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्दशीय संस्था नागभिड घेतला चिमुरमध्ये गावे समाविष्ट करण्याबाबत आक्षेप

30

🔹उपविभागीय अधिकारी,ब्रम्हपुरी, यांच्या मार्फत निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.12फेब्रुवारी):- महसुल व वनविभागाच्या शासन निर्णयाद्वारे अपर जिल्हाधिकारी कार्यालय, चिमुरला शासनाकडून मान्यता प्राप्त झालेली आहे असे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून वर्तमान पत्रामध्ये बातमी प्रसारीत करून कळविण्यात आलेली आम जनतेला,अपर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील चिमुर, सिंदेवाही, ब्रम्हपुरी व नागभीड या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला असल्याचे व त्या अंतर्गत 19 महसूल मंडळे, 113 तलाठी साझे व 652 गावांचा समावेश असल्याचा उल्लेख आहे.अपर जिल्हाधिकारी कार्यालय चिमुरमध्ये ही गावे समाविष्ट करण्याबाबत काही आक्षेप असल्यास 15 दिवसाच्या आत संबंधीत उपविभागीय कार्यालयात दाखल करण्याचे आव्हान आपणाकडून करण्यात आलेले आहे.

अपर जिल्हाधिकारी कार्यालय चिमुर अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये नागभीडचा समावेश करण्यात येऊ नये याकरीता समाजरत्नसंताजी जगनाडे महाराज तेली समाज बहूऊदेशिय संस्था नागभीड च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
चिमुर, सिंदेवाही, ब्रम्हपुरी व नागभीड़ या तालुक्यांचा व त्या अंतर्गत गावांचा सरासरी समान विकास झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा प्रशासकिय व्यवहार सुरळीत व्हावा म्हणून ब्रम्हपुरी या ठिकाणी पुर्वी पासूनच उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय असून त्यास जोड म्हणून च गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना वचक रहावा व प्रशासन सांभाळणे सोयीचे व्हावे म्हणून पोलिस उपविभागीय कार्यालय शासनाने निर्माण केलेला आहे. त्यामुळे उपजिल्हा कार्यालय किंवा जिल्हा कार्यालय निर्माण करतांना चंद्रपूर पासून समान अंतरावर व मध्यभागी सर्वांना सोयीचे होईल अशाच ठिकाणी उपजिल्हा किंवा जिल्हा कार्यालय निर्माण करण्यात यावे.

एखाद्या ठिकाणच्या शासकिय कार्यालयाची जाळपोळ करणे हा उपजिल्हा किंवा जिल्हा कार्यालय निर्माण करण्याचा निकष ठरू शकत नाही. समजा असे निकष गृहित धरण्यात आले तर या बाबींचा चुकीचा “संदेश” समाजात जावून लोकशाहीस मारक तत्व उदयास येतील.प्रभावी व सत्तेमध्ये असणाऱ्या राजकिय पुढान्याने उपजिल्हा कार्यालय सुरू न झाल्यास जनतेत (फक्त काही विशिष्ट) रोष उत्पन्न होवून बिकट स्थिती उद्भवण्याचा ईशारा वजा धमकी देणे व धमकी देऊन एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणे, आपल्या लोकशाही मुल्यांची अवहेलना करणारी ठरते व त्यामुळे सुध्दा धमक्यांना बळी न. पडता उपजिल्हा किंवा जिल्हा कार्यालय निर्माण करतांना संपूर्ण बाबीचा विचार होणे गरजेचे आहे.फक्त “चिमुर क्रांती” एवढी एकच बाब समोर करून उपजिल्हा किंवा जिल्हा कार्यालय निर्माण केले जाऊ शकत नाही, कारण भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरीता संपूर्ण भारतामधून इंग्रजांबिरूध्द लढे उभारले गेले व त्यामध्ये अनेक लोकांनी आपले प्राण व संपत्ती गमावलेली आहे. त्यामुळे “इंग्रजांविरूध्द उठाव” ही एकच बाब गृहित धरून चिमुरला उपजिल्हा कार्यालय देणे योग्य वाटत नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा विचार करता चिमुर हे गांव एका टोकाला असून दळण वळणाच्या दृष्टिने गैरसोयीचे आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रबोधनाला व वैचारीक क्रांतीला फक्त एका विशिष्ट ठिकाणा पुरता मर्यादीत करणे चुक आहे. कारण त्यांचे प्रबोधन कार्य राष्ट्रव्यापी आहे.त्यांच्या स्पर्शाच्या आशिर्वादाने अनेक गावे पावन झालेली आहेत. त्यामध्ये नागभीड-ब्रम्हपुरी मार्गावरील किरमीटी मेंढा जवळील “अड्याळ टेकडी” “भुवैकुंठ धाम” म्हणून प्रसिध्द आहे. या ठिकाणी प्रत्येक वर्षी जत्रा भरीत असते. या ठिकाणी संत तुकडोजी महाराज यांचे साहित्य उपलब्ध आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना मानणारे अनेक लोक या ठिकाणाला भेटी देतात. समलने आयोजित करतात व राष्ट्र संतांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करतात.

चिमुर परिसरात विपुल प्रमाणात नेसर्गीक व खनिज साधन संपत्तीची उपलब्धता नसल्यामुळे या परिसराचा विकास व रोजगार उपलब्धतेबाबत प्रशासनाकडून कोणताही विकास आराखडा जाहिर करण्यात आलेला नाही. सध्याचे चिमुर निर्वाचन क्षेत्राचे आमदार साहेब हे चिमुरचे निवासी असल्यामुळे त्यांना ब्रम्हपुरी, नागभीड व सिंदेवाही या क्षेत्रापेक्षा आपला गाव जास्त प्रिय असल्या कारणाने त्यांचा चिमुरच्या उपजिल्हा निर्मितीचा आग्रह तर नाही का? असे वाटते. जर हे खरे असेल तर त्यांची हो भुमिका इतरांवर अन्याय करणारी वाटते.

सामान्य जनतेच्या सोयीचा विचार न करता फक्त राजकिय दबावाला बळी पड़न एखाद्या गैरसोयीच्या ठिकाणी उपजिल्हा किंवा जिल्हा कार्यालय देणे ही बाब प्रशासकिय दृष्ट्या सुध्दा योग्य नाही. कोणतीही शासकिय कार्यालये, प्रशासन व जनतेच्या सोयीकरीता निर्माण केली जातात. कुणा विशिष्टांच्या ईच्छेकरीता नाही.

कृपया विशिष्टांना झुकते माप न देता सर्वांगीण विकासाचा व सामान्य जनतेचा सारासार विचार करून उपजिल्हा अथवा जिल्हा कार्यालय निर्माण कराल अशी मागणी करण्यात आली. निवेदन देते वेळी संस्थेचे अध्यक्षविनायक वासुदेव चिलबुले, उपाध्यक्ष ऑड. देविदास गोमाजी करकाडे ,सचिव श्री. हरीश्चंद्र जैरामजी मेहेर,सहसचिव श्री. मोरेश्वर पांडूरंग येरणे, कोषाध्यक्ष
श्री. मनिराम नत्थुजी सहारे, सदस्य श्री. श्रीराम घोंडूजी समर्थ, सदस्य श्री. प्रमोद विठोबाजी तर्वेकर उपस्थित होते.