रा.रो. ह.यो अंतर्गत सन 2016 -17 पासुन झालेल्या कुशल कामाकरीता पुरवठा केलेल्या साहीत्याचे देयके द्या -पुरवठा धारक संघटना

25

🔺साहित्य पुरवठा धारकाचा मृत्यू

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.12फेब्रुवारी):- ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत ला साहीत्य पुरवठा करणारे पुरवठा धारक असुन सन 2016 पासुन म.गा.रा.रो.ह.यो अंतर्गत मंजुर बांधकामाकरीता ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार साहीत्य पुरवठा केलेला आहे. तसेच सदर साहीत्याची नोंद संबधित ग्रामपंचायतने साठा रजिस्टर वर केलेली आहे. पुरवठा केलेल्या साहीत्याचे वापर करूण ग्रामपंचायत ने संबंधित योजनेतील विविध विकास कामे पूर्ण केलेली आहेत.
परंतु आजतागायत पुरवठा केलेल्या साहीत्याचे देयके आम्हास प्राप्त झालेले नाही. देयके करीता आम्ही संबधित ग्रामपंचायतला वारंवार विचारना केली असता या योजनेचा निधी आम्हाला प्राप्त झाला नसल्यामुळे आम्ही देयके देऊ शकत नाही. असे उत्तर मिळते, या संबधि वरीष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा अशी माहीती देण्यात आली.

त्यामुळे मा.गटविकास अधिकारी, पं.स.ब्रम्हपुरी, मा मुख्यकार्यकारी अधिकारी, जि. प.चंद्रपुर, मा.जिल्हाधिकारी, चंद्रपुर, मा. विभागीय आयुक्त म.गा.रा.रो.ह.यो नागपुर. यांना आम्ही निवेदने सादर केलेले आहेत. वरील विषयाची अधिकची माहीती घेतले असता असे समजले कि झालेल्या कामाची दोन वेळा चौकशी करण्यात आलेली आहे. व चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे. सदर कामात तांत्रिक दोष असेल तरीही आमचा यात काहीही संबंध नसतांना आमची पिळवणुक होत आहे.तसेच काही ग्रामपंचायतने देयके मिळण्याकरीता मा. उच्च न्यायालय, नागपुर यांचेकडे दाद मागीतली असता मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.चंद्रपुर, याना न्यायालयाच्या प्रश्नाला दाद दिलेले नाही.

याच मानसिक तनावाखाली येवुन आमच्यातीलच एक पुरवठा धारक श्री केवळजी ठाकरे रा.कालेता ता.ब्रम्हपुरी यांचा दुर्दैवी मृत्यु झालेला आहे. त्यामुळे आपणास मनपुर्वक विनंती आहे कि भविष्यात होणारी प्राणहाणी न होवु देता संबधित देयके मिळण्याकरीता आपण सहकार्य करावे यासाठी सदर निवेदन पंचायत राज समिती चंद्रपूर यांना देण्यात आला. निवेदन देतेवेळी अध्यक्ष गणेश घोरमोडे,उपाध्यक्ष संजय बगमारे,सचिव रोशन नवघडे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर दिवटे,सदस्य राकेश पिलारे,विनोद चिमुरकर, सुरेश ठिकरे, नंदु पिसे, अमोल सुकारे, दिलीप हीरे उपस्थित होते.