शास. औ.प्र.संस्थेत रस्ता सुरक्षा जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

29

🔹अपघात विरहित जीवनासाठी रस्ते सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे – प्राचार्य संतोष सांळुके

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.12फेब्रुवारी):- आपल्या देशात रस्त्याच्या लांबीबरोबर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. पण त्यामानाने लोकांकडून पाहिजे त्या प्रमाणात रस्ता सुरक्षा नियमांचा अवलंब होताना दिसत नाही. पर्यायाने दरवर्षी ५ लाख लोकांचे अपघात रस्त्यावर घडतात , त्यापैकी दीड लाख लोकांना आपला प्राण गमावावा लागतो , हे चिंताजनक आहे. म्हणून अपघात विरहित मानवी जीवनासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य संतोष सांळुके यांनी केले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , वाहतुक पोलिस विभागाचे संयुक्त विद्यमाने संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या परिसरात करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य संतोष सांळुके होते. याप्रसंगी नॕशनल हायवे ॲथरिटी चे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा , शाखा अभियंता आशिष आवळे , वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंडलवार , जिल्हा वाहतुक शाखेचे सौ. गोरे ,आर.टी.ओ. निरीक्षक शफिक उचगावकर , चेतन पाटील , सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ कावळे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी विवेक मिश्रा आणि शफीक उचगावकर यांनी रस्ते नियम आणि नागरिकांची जबाबदारी यावर विस्तृतपणे प्रकाश टाकला. सूत्रसंचालन संतोष बोंद्रे यांनी केले तर विवेक गढे यांनी आभार मानले. प्रास्तविक कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटनिदेशक इखे ,गांगरेड्डीवार , पुरम, भरडकर आदींनी परिश्रम घेतले .