गंगाखेडला मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.12फेब्रुवारी):-विविध सामाजीक ऊपक्रम राबवणाऱ्या सवंगडी कट्टा समुह आणि सुश्रुत आयसीयू रूग्णालय यांच्या वतीने गंगाखेड येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात टूडी ईको, थायरॉईड, मधुमेह यासारख्या महागड्या तपासण्या मोफत केल्या जाणार असून याचा जास्तीत जास्त गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समुहाच्या वतीने करण्यात आले आहे.

सवंगडी कट्टा समुहाचे सदस्य आणि गंगाखेड ऊपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गंगाखेडचे ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पोलीस ऊपअधिक्षक मिलींद खोडवे, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या प्रमुख ऊपस्थितीत शिबीराचे ऊद्घाटन संपन्न होईल. समुहाचे प्रकाश घण, रमेश औसेकर, मनोज नाव्हेकर, कारभारी निरस, प्रा.डॅा.मुंजाजी चोरघडे, माधवराव शेंडगे, नागेश पैठणकर, गोविंद यादव, गजानन महाजन, डॅा.केशव मुंढे, डॅा.पारस जैन, डॉ. देवीदास चव्हाण, डॅा.योगेश मल्लुरवार, प्रविण जायभाये, राजकुमार फड, लक्ष्मीकांत नाव्हेकर, प्रशांत शिंदे, विलास देशमुख, अतुल तुपकर, सुहास देशमाने, नंदकुमार सोमाणी, शेख खाजा भाई, अक्षय जैन, हरीभाऊ सावरे, दिलीप सोळंके आदिंच्या पुढाकारातून हे शिबीर संपन्न होत आहे. या शिबीरात प्रामुख्याने विविध तज्ञ डॉक्टरांकडून रूग्णांची तपासणी केली जाईल. आवश्यक असणाऱ्या सर्व ह्रदयरोग रुग्णांची 2 D Echo तपासणी व मार्गदर्शन, मधुमेह रुग्णांसाठी HbA1C तपासणी, थायरॅाईड तपासणी व मार्गदर्शन आदि सेवा मोफत दिल्या जातील.

१४ फेब्रुवारी रविवार रोजी द्वारका फंक्शन हॉल, गंगाखेड येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत या रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सेवांचा जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन सवंगडी कट्टा समुहाच्या वतीने करण्यात आले आहे.