जिवती तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्याचा भव्य धडक मोर्चा

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.12फेब्रुवारी):- तालुक्यातील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे दया.या संदर्भात संत रामराव महाराज मठ येथून संत रामराव महाराज यांच्या पुतळ्याची पूजा करून, सुदाम भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली रामराव महाराज मठ ते तहसील कार्यालया पर्यंत भव्य पायदळ मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिवती तालुक्यातील शेतक-याच्या समस्याविषयी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यात तीन पिढ्याची अट रद्द करून अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पट्टे दया.बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती करून नौकर भरती चालु करा.गाव तिथे वाचनालय, व गाव तिथे स्मशान भूमीची निर्मिती करा,जिवती येथे कोर्ट इमारतिचे बांधकाम करा, लाॅकडाऊन काळातील वीजबिल माफ करा,तालुक्यातील कच्चे रस्ते पक्के करा,अशा तालुक्यातील विविध समस्या विषयी यावेळी भव्य मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी या मोर्चाचे आयोजन विदर्भ युवा आघाडी समिती जिवती, व आम आदमी पार्टी जिवती,शेतकरी संघटना जिवती,गोर सेना जिवती,यांनी संयुक्त पणे मोर्चाच आयोजन केले होते.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार शेतकरी संघटना अॅड वामनराव चटप,देविदास वारे, इस्माईल शेख,रमेश पुरी,गणेश कदम,तर आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्री.सुनील देवराव मुसळे,जिल्हा सचिव संतोष दोरखंडे,मिलिंद गडमवार,राजुरा विधानसभा प्रमुख प्रदीप बोबडे,आप तालुका अध्यक्ष श्री.मारोती पुरी,ता.सचिव गोविंद गोरे,उपाध्यक्ष सुनील राठोड,उद्धव मरके,विकास चव्हाण,विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष सुदाम राठोड,अरविंद चव्हाण,विशाल राठोड, विनायक चव्हाण,अरविंद पवार,विकास राठोड, विनोद पवार, पंडित राठोड,तर गोर सेनेचे प्रकाश पवार,उत्तम पवार, तसेच या मोर्चात तालुक्यातील असंख्य शेतकरी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED