प्रस्थापितांच्या छताडावर लाथ मारून ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा फडकवला झेंडा- ताजुल मेश्राम

28

🔹गट ग्रामपंचायत खापरी (धर्मु)येथे विकास कामे करणार

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.12फेब्रुवारी):- जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी प्रतिनिधी भाऊराव जगन मेश्राम आणि ताजुल नथ्थुजी मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा स्पष्ट बहुमताने खापरी (ध) निवडणुकीत विजय मिळविला.सौ श्रेया मयूर शेंडे सरपंच पदी तर युवा नेतृत्व दिपक रामकृष्ण बुरडकर यांची उपसरपंच पदी निवड निवड करण्यात आली.नवनिर्वाचित सदस्या सौ सविता योगेश रामटेके, श्री योगेश ईसोबा खोब्रागडे, सौ देवकण्या वामन भरडे यांचा समावेश आहे. यासर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

“ग्रामविकास परिवर्तन पॅनल कोणत्याही राजकीय पक्षांशी कोणताही संबंध नाही हे सर्वात आधी स्पष्ट करतो. आम्ही 1 वर्षापासून ग्रामपंचायत निवडणूकीची तयारी सुरू केली होती. सर्व लोकांना विश्वासात घेऊन विकासाचा आराखडा तयार केला पुरुष, महिला, जेष्ठ,युवक जनसंपर्क वाढवून आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आणि ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या नावाखाली आम्ही निवडणूक लढवली आणि निवडणूक सुद्धा जिंकलो.

हे श्रेय माझ एकट्याच नसून ज्यांनी ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केल आणि आमच्या सोबत राहून आम्हाला ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केल त्या सर्वांच श्रेय आहे. जनतेनी जो विश्वास आमच्याकडे दिला त्या विश्वासाला कधी तळा जाऊ देणार नाही.” अशी प्रतिक्रिया ताजुल नथ्थुजी मेश्राम (सामाजिक युवा कार्यकर्ता)यांनी व्यक्त केली.सर्व मतदार बंधू आणि भगिनी युवा वर्ग ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या सोबत राहून प्रचंड बहुमतांनी निवडून दिल्या बद्दल आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल खापरी (धर्मु) आणि उमरी (बुट्टी) समस्त जनतेचे मनःपूर्वक आभार ताजुल मेश्राम यांनी मानले.