उमरीच्या शुभम कसबेंची भारतीय नौदल सेनेत निवड झाल्याबद्दल पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

30

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.12फेब्रुवारी)):-तालुक्यातील उमरी या गावचे भूमिपुत्र शुभम कसबेची भारतीय नौदल सेनेत निवड झाल्याबद्दल पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने त्याच्या आई वाडीलांसह दि 11 गुरुवार रोजी सत्कार करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की केज शहरालगत उमरी या अत्यंत छोट्याश्या खेडे गावातील शुभम ची परिस्थिती प्रतिकूल असतानाही तिच्यावर मात करून मेहनत घेत भारतीय नौदल सेनेत ऑल इंडिया मेडल 26 प्राप्त करत डशर चरप म्हणून कोची(केरळ) येथे शुभम कसबेंची देशाच्या रक्षनार्थ निवड झाली म्हणून महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने आई वाडीलांसह सत्कार करण्यात आला.

यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मुजमुले, सचिव रंजित घाडगे,शहर संघटक अनिल वैरागे,शिवम इलेक्ट्रॉनिक चे सर्वेसर्वा पाटोळे, सह पदाधिकारी उपस्थित होते.