
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100
म्हसवड(दि.12फेब्रुवारी):-कार्य अध्यक्ष, भीमराव यशवंत आंबेडकर यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा अध्यक्ष आद. व्ही. आर. थोरवडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी भारतीय बौद्ध महासभा कोरेगाव तालुक्याच्या वतीने तालुक्यात सिद्धार्थ नगर तालुका कोरेगाव येथे “उपासिका धम्म प्रशिक्षण” शिबिर दहा दिवसाचे राबविण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी राष्ट्रीय सचिव आद. एन. एम. आ गाणे काका, प्रमुख मार्गदर्शक सातारा जिल्हा अध्यक्ष आद. व्ही. आर. थोरवडे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा कोरेगाव तालुका अध्यक्ष अनिल कांबळे हे होते माता रमाई जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्व धम्म उपासीकांना प्रमाणपत्र वाटप करणेत आले.
यावेळी जिल्हा महासचिव आद. विद्याधर जी गायकवाड साहेब, सिद्धार्थ नगर सरपंच गोविंद कदम जिल्हा सहसचिव आप्पा अडसूळ महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय शिक्षिका मीनाताई इनजे मॅडम, शोभाताई कांबळे, भागवत, भोसले सर तसेच नंदकुमार काळे सातारा तालुका दिलीप यादव सिद्धार्थनगर येथील शाहीर तुकाराम कांबळे, नामदेव जगताप, आनंदराव कांबळे, सनी कांबळे, मनोज कदम इ.मान्यवर उपस्थित होते.
