ब्रम्हपुरी पोलिसांनी अवघ्या! आठ तासात लावला चोरीचा छडा!

25

🔺पतसंस्थेचा चपराशीच निघाला चोरटा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.12फेब्रुवारी):-स्थानिक ब्रम्हपुरी-नागभीड मार्गावर असलेल्या रंगनाथ स्वामी पतसंस्थेत दि 11 फेब्रुवारी गुरुवारी सदर पतसंस्थेत सकाळी 10:30 वाजता चोरी झाल्याचे उघडकीस आले होते सदर पतसंस्थेच्या मॅनेजरने याची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये केली होती.त्यानुसार ब्रम्हपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या आठ तासात सदर पतसंस्थेचा आरोपी चपराशी राजू श्रीपद गराडे (32) यास अटक करून चोरीस गेलेली 5 लाख 25 हजार 140 रुपयांची रोख रक्कम व चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य हस्तगत करीत अवघ्या आठ तासात चोरीच्या घटनेचा छडा लावला त्याबद्दल सर्वत्र ब्रम्हपुरी पोलिसांचे कौतुक होत आहे.

सविस्तर माहिती नुसार दि 11 फेब्रुवारी गुरुवारी सकाळी 10:30 वाजता सदर ठिकाणी कार्यरत असलेला चपराशी गेला असता त्याला पतसंस्थेच्या मॅनेजरचा दरवाजा उघडा दिसला तसेच काही समान अस्ताव्यस्त दिसून आले होते याची माहिती सदर चपराश्याने मॅनेजर आनंद वसाके यांना दिली असता मॅनेजर तात्काळ पतसंस्थेत दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली असता 5 लाख 25 हजार 140 रुपयांची चोरीला गेल्याचे समजले त्यांनी तात्काळ याची माहिती ब्रम्हपुरी पोलिसांना दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवून तसेच श्वानपथक,अंगुलीमुद्रा पथकाला पाचारण करण्यात येऊन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण चौकशी केल्यानंतर आरोपीचे पोलिसांना धागेदोरे गवसले असता पोलिसांनी सदर पतसंस्थेचा आरोपी चपराशी राजू श्रीपद गराडे (32) यास अटक करून त्याच्या राहत्या घराची झाडझडती घेतली असता पोलिसांना एका तांदळाच्या डब्यात लपवून ठेवलेली 5 लाख 25 हजार 140 रुपयांची रोख रक्कम सापडली तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली लोखंडी सळाख व कटर जप्त करण्यात आले यावरून ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये कलम 457,380 भादवी अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे,अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे,पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे,राजेश उंदिरवाडे, स्वाती फुलेकर, पोहवा.अरुण पिसे डिबी पथकाचे कर्मचारी अमोल गिरडकर,योगेश शिवणकर,संदेश देवगडे, अजय कटाईत,विजय मैंद,मुकेश गजबे,शुभांगी शेमले यांनी केलेली आहे अवघ्या काही तासात ब्रम्हपुरी पोलिसांनी चोरीच्या घटनेचा छडा लावला त्याबद्दल ब्रम्हपुरी पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.