नाशिक जिल्हा रुग्णालयातून दीड वर्षाच्या मुलीला नेले पळवून

28

✒️निफाड प्रतिनिधी(विजय केदारे)मो:-9403277887

नाशिक(दि.13फेब्रुवारी):-नाशिक जिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी आलेल्या मातेची नजर चुकून अज्ञात भामट्याने तिची एक वर्षाची मुलगी जिल्हा रुग्णालयातून पळून नेण्याची धक्कादायक घटना आज घडली आहे एक महिला आपल्या एक वर्षाच्या मुलीला घेऊन जिल्हा रुग्णालयात नियमित तपासणी साठी आली होती.

यावेळी बाळाला बाहेरील बाकड्यावर बसून महिला तपासणीसाठी डॉक्टर कडे गेली असता संधी साजत एका व्यक्तीने त्या मुलीला पळवून नेले ही घटना लक्षात येता महिलेने आरडाओरड केली मात्र तोपर्यंत ही व्यक्ती निघून गेली होती संपूर्ण घटना सीसीटीवी मध्ये कैद झाली आहे पोलिसांनी फुटेजवरून तपास सुरू केला असून मुलीचा शोधण्यासाठी ठिकाणी पथके रवाना झाली आहे.