आदर्श महिला सन्मानाचे मानकरी ठरल्या पोलिस निरिक्षक सविता खर्जुरे व प्राचार्य भाग्यश्री हाळीकर

    42

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.13फेब्रुवारी):-मागील तीन वर्षापासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संघर्षमय जीवनातून यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात येत असून मागील वर्षी नांदेड शहरातील नवा मोंढा येथील आडत व्यापारी तथा उद्योजिका काशीबाई गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.

    यावर्षी नांदेडच्या पोलिस अधिक्षक कार्यालयातील कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकारी हिंगोलीच्या भुमिपुत्र सविता खर्जुरे व नांदेड शहरातील व्हिआयटीएम महाविद्यालयाच्या प्राचार्य भाग्यश्री हाळीकर यांच्या कार्याची दखल घेऊन तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या यंदाच्या सन्मान सोहळ्याच्या मानकरी ठरल्या असून त्यांना जागतिक महिला दिली सन्मानित करण्यात येणार असल्याचे संस्था प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते कुलदीप सुर्यवंशी गोणारकर यांनी कळविले आहे.