शेतकरी जे पेरतो तेच उगवते ?

35

दिल्ली च्या तीन सीमेवर जे शेतकरी गेल्या सत्तर दिवसापासून आंदोलन करीत आहेत, त्यांची नोंद जागतिक पातळीवर झाली आहे. ज्या ज्या देशात मानवता जीवनात आहे त्या त्या देशातील सद्विवेकबुद्धी असलेल्या माणसांनी सेलिब्रिटी नी शेतकरी आंदोलन बाबत दुःख व्यक्त केले.पण भारतातील तीन टक्के समाजाच्या लोकांची मनुवादी मानसिकता मानवतावादी कधीच नव्हती.त्यांनी रामाच्या नांवाचा वापर करून मराठा,ओबीसी मागासवर्गीय आदिवासी समाजाला कट्टरपंथी बनवुन देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, काळाधन,अतिरेकी हल्ले कोणकोणत्या प्रकारचे जन आंदोलने केली.आणि सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण केला.

२०१४ ला केंद्रातील सत्ता काबीज केली. पांच वर्षात लोकशाहीचे चारी खांब पूर्णपणे पोखरून ठेवले.२०१९ च्या निवडणूकीत इ व्ही एम मशीन द्वारे पूर्ण बहुमत मिळविले. आणि लोकशाही गाडून हुकूमशाही निर्माण केली.कामगार कर्मचारी सर्व सार्वजनिक कंपन्या अदानी,अंबानीला विकून कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाला उध्वस्त करून ठेवले.त्याविरोधात कामगार कर्मचारी त्यांच्या संघटना युनियन यांनी देशभरात आंदोलने करून शक्ती प्रदर्शन केले नाही.कारण कामगार,कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटना युनियन ह्या प्रथम मनुवादी हिंदू आहेत नंतर पुरोगामी, समाजवादी,कम्युनिस्ट मार्क्सवादी त्यामुळेच भारतीय मजदूर संघाचे सर्व कामगार कर्मचारी युनियन वर कायमस्वरूपी वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. 

शेतकरी आंदोलनामुळे मात्र सर्वच मनुवादी विचारांची मानसिकता असणाऱ्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांची मोठी गोची झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही फरक पडला नाही.असंवेदनशील हिंस प्रवृत्तीची त्यांची मानसिकता त्यांच्या वैचारिक विचारधारेत आणि आचरणात आहे.यांच्यातील कला,कौशल्याला देशातील नागरिकांनी किती ही डोक्यावर घेऊन प्रेम दिले तरी ते सेलिब्रिटी योग्य वेळी आपली जात दाखवून देतात हा इतिहास आहे.

जगातील जागतिक पातळीवर प्रसिद्ध असणारे सेलिब्रिटी भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनाला फेसबुक, ट्विटर वर पाठिंबा देतात.रिहानाच्या एका ट्विट ने भारतातील सेलिब्रिटीची झोप उडवून दिली. तेव्हा भारतातील सेलिब्रिटी आपल्या जातीच्या सरकारचे स्वरक्षणा साठी झुरळा सारखे बाहेर येतात.हे मराठा ओबीसी मागासवर्गीय समाजातील सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे. मराठा,ओबीसी मागासवर्गीय स्वतःची जात विसरून त्यांच्यात वैचारिक गुलाम म्हणून सहभागी होतात.ते स्वतःच्या जातीच्या रक्षणासाठी कधीच त्यांच्यातून बाहेर पडून बोलण्याची लिहण्याची हिंमत दाखवत नाही.

शेतकरी हा शेतकरीचं असतो तो जेव्हा पेरतो तेव्हा ते उगवतेच. आज शेतकरी आंदोलनांचे पडसाद भारतात कमी आणि परदेशात जागतिक पातळीवर त्यांचे पडसाद उमटले जात आहेत.कारण शेतकरी जे पिकवतो त्याला हमीभाव असावा.एम आर पी असावी.त्यालाच कृषिधोरण कृषी कायदा असावा असे शेतकरी मागत असतांना मोदींनी गौतम अदानी कृषी बिल स्पेशल अध्यादेश काढून मंजूर करून टाकले.त्या विरोधात हे शेतकरी आंदोलने सुरू आहेत त्यांची दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांच्या वस्तू ची किंमत ठरविणे अवघड आहे.
माणसाने एक दाणा पेरला असता, आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ?. शेतकरी एक एक दाणा जमिनीत पेरतो त्यांची मशागत करतो,रात्रंदिवस त्यांची जपवणूक करतो तेव्हा निसर्ग त्याला हजारो, लाखो दाणे देतो.त्यांची किंमत कोण कशी ठरवतो हाच मोठा प्रश्न आज देशातील शेतकऱ्यांसमोर आहे.
धान्य पेरावं की खावं हेच आजच्या माणसांना सुचलं नाही .
पण निसर्गाने माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो.अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत?.ते ही खूप महत्वाचे आहे.

आर एस एस प्रणित सर्व संघटना संस्थानी भारतीय समाजात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि आता शेवटी राजकीय भेदभाव दुःख, राग, द्वेष, मत्सर दहशत पेरला आहे. त्यामुळे भारतात सर्वधर्मसमभाव राहिला नाही. असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही. कामगार, कर्मचारी अधिकारी, विद्यार्थी सर्वच हिंदू धर्मातील होते.त्यांच्यासाठी असणारे कामगार कायदे रद्द करून भांडवलदारांच्या सोयीचे कायदे करून कोण उध्वस्त झाला. आता नंबर शेतकऱ्यांचा होता.पंजाब हरियाणा राज्यातील शेतकरी त्यांची शिक्षा भोगत असतांनाच तोच संघटित पणे रस्त्यावर उतरून आंदोलनजीवी झाला.बाकीच्या राज्यातील शेतकरी कुठे आहे?.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी भाजपाच्या आमदार खासदारांचा वाढदिवसाच्या मोठया प्रमाणात आनंदाने उत्स्फूर्तपणे साजरा करतांना दिसतो.शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध असणारे पत्रकार, संपादक त्यांच्या वृत्तपत्रांत भाजपा आमदार खासदारांचे गुणगौरव करतांना दिसतात. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची झळ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांत पोचली असती तर त्यानी भाजपा आमदार खासदारांचे मुचके बांधून त्याला मतदारसंघात फिरणे मुश्किल केले असते. म्हणूनच शेतकरी आंदोलनाची झळ फक्त दिल्लीत दिसते.
संपूर्ण देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, काळाधन, अतिरेकी हल्ले याविरोधात प्रचंड असंतोष आहे,पण बाहेर येत नाही. कारण आर एस एस प्रणित पक्ष संघटना संस्था सारखी कंबरचे सोडून डोक्याला बांधण्याचे नाटकी आंदोलन कोणी करू शकत नाही. पोटात एक आणि ओटात दुसरे हे इतर पक्षांना जमत नाही, ते हिंसक आंदोलन करून सार्वजनिक मालमतेचे नुकसान किंवा जनतेचे आर्थिक नुकसान होणार नाही त्यात जीवितहानी होणार नाही यांची गांभीर्याने विचार करून शेतकरी आंदोलने सुरू आहेत. असंवेदनशील, अमानवी हिंसक विचारधारा शेतकऱ्यांचे रक्तात नसते.म्हणूनच शेतकरी जे पेरतो ते च उगवते असे म्हणतात. सत्तर दिवस शांततेने चाललेल्या आंदोलनाला आंदोलनजीवी परजीवी म्हणणे हे ज्यांचं रक्तात व विचाराधारेत आहे.

त्यांच्या कडून कोणतीही अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यांनी गेला सहा वर्षात जे पेरले ते महाभयंकर आहे,त्यांचे परिणाम येणाऱ्या पिढीला हजारो वर्षे भोगावे लागतील. शेतकरी जे पेरतात ते सर्वांना पोटाला लागणारे असते.त्यात सर्वच मानव प्राणी सुखासमाधानाने जगू शकतात. हे आज जे लोक विसरले आहेत त्यांनी वेळीच भानावर आले पाहिजे. अन्यता येणारा काळ कोणालाच माफ करणार नाही.

✒️सागर रामभाऊ तायडे(मो:-९९२०४०३८६९)भांडुप मुंबई