रेल्वे मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर धनराज विक्रम गुट्टे यांची नियुक्ती

34

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.14फेब्रुवारी):- रेल्वे मंत्रालयाच्या (भारतीय मध्य रेल्वे )सल्लागार समितीवर भाजपचे विदर्भ प्रभारी , अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचे अध्यक्ष, ओबीसी संघर्ष समितीचे निमंत्रक धनराज विक्रम गुट्टे निवड झाली आहे .हि निवड केंद्रीय रेल्वे मंत्री पियुषजी गोयल यांच्या आदेशानुसार झालेली आहे . यापूर्वी धनराज गुट्टे हे दक्षिण मध्ये रेल्वेचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. तिथे केलेल्या कामाची दखल घेऊन आज त्यांची भारतीय मध्य रेल्वे सल्लागार समितीवर निवड झाली आहे. मध्य रेल्वेच्या अंतर्गत महाराष्ट्र,कर्नाटक,मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या चार राज्यांचा समावेश आहे.

उच्च शिक्षित असणारे धनराज विक्रम गुट्टे यांचा जन्म 25 एप्रिल 1989 रोजी येलदरी ता अहमदपूर जिल्हा लातूर येथे सर्वसामान्य कुटुंबात झालेला आहे .त्यांचे पुढील शिक्षण परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठ येथून पूर्ण झालेले आहे .( बी.टेक फूड)महाविद्यालयीन जीवनापासून धनराज गुट्टे हे विद्यार्थी आंदोलन,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या माध्यमातून सक्रिय सहभागी होते.तसेच ते अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा परिचित आहेत प्रशासनावर त्यांची मजबूत पकड आहे,सध्या ते भाजपचे विदर्भ प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथून त्यांचे सतत तीन वर्षे प्रगत प्रशिक्षण कार्यकर्ता वर्ग पूर्ण केलेला आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब,भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे यांचे एकनिष्ठ व कट्टर समर्थक म्हणून ते सर्वदूर परिचित आहेत.अनेक आंदोलनामध्ये त्यांचा कायम सक्रिय सहभाग राहिलेला असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह शेजारील अनेक राज्यात त्यांचा मोठा जनसंपर्क व मित्र परिवार आहे. तसेच ते एक उत्कृष्ट वक्ते व संघटक आहेत.कायम ते पक्षाच्या व संघटनेच्या कामासाठी दिवसरात्र प्रवास करत असतात.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या येलदरी गावची ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आलेली आहे. यामुळेच सदरील पोस्टला गल्ली ते दिल्ली असे शीर्षक देण्यात आले एकाच आठवड्यात ग्रामपंचायत तर तसेच दिल्ली अंतर्गत विशेष पद हे कोणाला जमने एकप्रकारे अशक्यच आहे. गल्ली ते दिल्ली प्रवास असून सुद्धा कायम जमिनीवर असणारे व सर्व युवकांना आपला वाटणारा माणूस म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या माध्यमातून त्यांना मानणारा एक मोठा वर्ग देशभरात तयार झालेला आहे.
रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून दक्षिण मध्ये रेल्वे वर त्यांनी सन 2018 ते डिसेंम्बर 2020 पर्यंत काम केले आहेत. त्याच कार्याची पावती म्हणून धनराज भाऊ गुट्टे याना आता चार राज्यात काम करण्याची मध्य रेल्वे वर जबाबदारी दिलेली आहे. तिरुपती ते मनमाड असे त्यांचे या पूर्वी कार्यक्षेत्र होते .नांदेड लातूर रेल्वे मार्ग मंजूर करून घेण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. म्हणून आता फेब्रुवारी 2021 पासून त्यांची भारत सरकारच्या मध्य रेल्वे वर केंद्र सरकार कडून निवड झालेली आहे .31 वर्षीय धनराज गुट्टे हे वंजारी समाजातील एकमेव सर्वात कमी वयाचे सदस्य म्हणून देशाच्या रेल्वे समितीवर कार्यरत असणार आहेत. सलग दुसऱ्या वेळी निवड होणारे ते वंजारी समाजातील एकमेव आहेत.

या निवडीचे आदेश रेल्वे बोर्ड ,दिल्ली येथून निर्गमित झालेले आहेत. प्रत्यक्ष रेल्वे बोर्डात जाऊन सर्व औपचारिकता श्री.गुट्टे यांनी पूर्ण केलेली आहे.धनराज गुट्टे यांची भारतीय मध्य रेल्वेच्या सल्लागार पदी निवड होण्यासाठी रेल्वे मंत्री भारत सरकार याना भाजप च्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, खासदार पुनमताई महाजन, खासदार प्रीतमताई मुंडे, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार सुधाकरजी शृंगारे ,राज्यसभेचे खासदार डॉ भागवत कराड ,माजी मंत्री विनायकराव पाटील , आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड,आमदार अभिमन्यू पवार,आमदार रत्नाकर गुट्टे ,लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे,आदीं मान्यवरांनी शिफारस केलेली होती.धनराज गुट्टे यांच्या सारख्या गरीब सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य युवकाला आज 4 राज्यात रेल्वे विभागात सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रधान मंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, गृहमंत्री अमित भाई शहा ,भाजप अध्यक्ष श्रीमान जे पी नड्डा , परिवहन मंत्री नितीनजी गडकरी, श्रीमती पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे ,भाजप प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय सचिव विनोदजी तावडे ,आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब,माझे गुरू श्रीमान प्रवीण दादा घुगे साहेब आदींचे त्यांनी आभार मानले आहेत. सदरील निवडीबद्दल त्यांचे सर्व वरिष्ठ मान्यवराकडून अभिनंदन व कौतुक होत आहे .