राष्ट्रवादी काँग्रेस च्या ब्रह्मपुरी विधानसभा अध्यक्षपदी जगदीश उर्फ मोंटू पिलारे तर जिल्हासचिव पदी अनुकूल शेंडे यांची नियुक्ती

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.15फेब्रुवारी):-राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीत ब्रम्हपुरी येथील युवा नेते जगदीश उर्फ मोंटू पिलारे यांच्यासह अनेक नवयुवक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला होता.

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात असलेल्या त्यांच्या वर्चस्वाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील घराघरात शरदचंद्र पवार साहेबांचे विचार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या आणि बळकट बनविण्याच्या उदात्त हेतूने ब्रह्मपुरी येथील युवानेते जगदीश उर्फ मोंटू पिलारे यांची ब्रह्मपुरी विधानसभा अध्यक्षपदी तर अनुकूल शेंडे यांची जिल्हा सचिव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी वैद्य यांनी पत्र देऊन नियुक्ती केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार मोरेश्वर टेंभुर्णे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील दहेगावकर, ब्रह्मपुरी तालुका अध्यक्ष वासुभाऊ सोंदरकर, अतुल राऊत, अमोल ठेंगरी, राकेश शेंडे, अक्षय जांबूळे यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.