टेकेपार ग्रामपंचायतवर भाजपा गटाचे वर्चस्व

  41

  ?वच्चला वरखडे सरपंच व विलास चटपकार उपसरपंच

  ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चिमूर(दि.15फेब्रुवारी):- चिमुर तालुक्यात टेकेपार ग्रामपंचायतच्या झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपा समर्थित गटाने बाजी मारली आहे. वच्चला वरखडे यांची सरपंचपदी व विलास चटपकार यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.

  वैशाली गणोरकर, दिनकर रणदिवे, रविना गणवीर
  असे भाजपा समर्थीत प्रगती पँनलकडे 7 पैकी 5 सदस्य होते.या ग्रामपंचायत निवडणुकीत गट प्रमुख ओमप्रकाश पाटील गणोरकर यांंची खुप मेहनत आहे.

  प्रवीण गणोरकर, प्रकाशजी वाकडे, कवडुजी पेंद्राम, नेताजी लोधे, सलाम शेख, सोहम गोरवे, अनिल बारेकर, अशोक देवतळे, प्रशांत ढोणे, रामदास भोयर, गंगाधर इटनकर, घनश्याम देवतळे, उमेश मेंडुलकर सौरभ मस्के यांंनी सरपंच व उपसरपंचाचे अभीनंदन केले आहे.