निसर्गमित्र व्हा !…झाडे लावा – झाडे जगवा

47

झाडें ही निसर्गाने दिलेले खुप मोठ वरदान आहे. झाड फक्त आपल्याला देतच राहते. झाडामुळेच जमीनीची धूप होत नाही. झांडामुळेच पाऊस पडतो. हे मानवाला कळत नाही. दिवसेन दिवस झाडाची तोंड होत आहे. त्यामुळे खुप मोठे संकट येणार आहे. झांडाची अशी कत्तल होत राहीली तर वाळवंट होआयला वेळ लागणार नाही. झाड काय देत. तोडल तर काय फरक पडला. असा व्यक्ती विचार करतो. पण त्याला हे कळत नाही . जो तो ऑक्सीजन वायु घेतो तो त्याला झाडा कडूनच तर भेटतो . झाड काय देत …

१)एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.

२)एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
३)एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.

४)एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.

५)एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.

६)एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2 अंशाने कमी करते.

७)एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.

८)एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.

९)एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.

१०) एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.

११)एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.

१२)एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते. एक झाड फळ,फुल,बिया , सावली आपल्यासाठी देते.एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.आता नाही तर कधीच नाही.तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने पूरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.

तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.

।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।

” निसर्ग मित्र व्हा ” झाडे लावा झाडे जगवा. जिवन वाचवा . सुंदर वसुंदरा तयार करा . प्रत्येकाने १ झाड लावलच पाहिजे असा संकल्प केलाच पाहिजे. व झाड जगवल पाहिजे. फक्त झाड लावून फायदा नाही त्याचं संगोपन करन हे सुद्धा आपल आदय कर्तव्य आहे. तरच आपण निसर्गाचे खरे आभार मानू शकतो.

सुंदर आहे ही धरा ‘त्याची काळजी घे जरा .
वृक्षवेलींनी सजलेली ,पक्षी पाखरे गाणी गाती
निसर्ग आमचा मित्र सखा ,पडतो उपयोगी अनेक वेळा
अमानुषपणे असे वागू नको ,धरतीला देऊ नको कळा
मानवाच्या तीन मूलभूत गरजा ,अन्न, वस्त्र आणि निवारा
सर्वच गोष्टी तोच पुरवितो ,एकदा तरी त्याचा विचार करा
त्याची काळजी घे जरा,आपली इच्छा व गरज भागविण्यासाठी जंगलातली झाडे केली साफ ,स्वार्थी आपल्या या वागण्याला निसर्ग करणार नाही माफ ,पुढची पिढी जगवायची असेल तर एक तरी झाड लाव मित्रा ,निसर्ग जगला आणि वाढला तरच राहील आपला नाव खरा ,त्याची काळजी घे जरा एक तरी झाड लाव मित्रा.

✒️शब्दसंकलन:-श्री. निलेश धर्मराज पाटील (प्राथ. शिक्षक )जि.प. शाळा थोरगव्हाण ता. यावल जि. जळगाव
मोबाईल नं.९४०३७४६७५२