60 गरजू कुटुंबांना राशन किट वाटप

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.15फेब्रुवारी):-नारायण सेवा संस्थान उदयपुर येथील संस्थापक आदरणीय कैलाशजी मानव व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.प्रशांत भैय्या अग्रवाल यांच्या सौजन्याने
गंगाखेड-परभणी शाखेच्या अध्यक्षा सौ.मंजूताई दर्डा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नारायण गरीब कुटुंब राशन वितरण योजनेत गरीब, गरजू परिवाराला आज, 14 फेब्रुवारी 2021 , रविवारी नारायण सेवा संस्थान शाखा गंगाखेड, कांकरिया निवास स्थानी महाशिविरमध्ये आज ६० गरजू कुटुंबांना राशन किट वाटप करण्यात आले.

एका महिन्याच्या खाद्यपदार्थांमध्ये राशन किटमध्ये १५ kg किलो पीठ, २kg किलो डाळ,चना दाल, ५kg किलो तांदूळ, ४ किलो साखर, २ किलो तेल, ५०० ग्रॅम मिरची, २५०ग्रॅम हळद,२०० धना पावडर दिले गेले.असे एकूण ३० किलो राशन चे प्रत्येकि असे ६० किट तयार करण्यात आले.

या राशन महाशिबिरासाठी उदघाटन कर्ता म्हणून तहसीलदार स्वरूपजी कंकाल सर,प्रमुख पाहुने प्रो.डॉ. दिनानाथजी फुलवाड़कर,बालासाहेब राखे ,संतोष तापड़िया ,डी.आर .चीनके ,श्रीधर मुरकुटे , विट्ठल चामे ,सुहास पाठक,या कार्यक्रमास उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत हा महाशिबिर घेण्यात आले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहयोगी साधक पूजा दर्डा,सिद्धार्थ दर्डा,शंकेश धोका, सौ.सुजाता पेकम,अमर गंगाखेडकर,बालासाहेब पुरनाळे,हर्ष आंधळे इ.नी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED