सौ.वैशाली सुनिल सौदांणे -चव्हाण, यांना 2021 चा कसमादे भुषण आणि कोटक लाईफ या पुरस्कार देऊन संन्मानित केले

24

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.15फेब्रुवारी):- येथिल आस्था अनघादि फौंउडेशन च्या संस्थपिका अध्यक्षा,तसेच आदिवासी वाल्मिकलव्य सेना प्रदेश कार्यअध्यक्ष,रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट उपाध्यक्ष, पैलवान ग्रुप जिल्हा अध्यक्ष,अँटी करोना टास्क फॉर्स च्या जिल्हा अध्यक्ष,ग्लोबल इंटरनॅशनल च्या महाराष्ट्र उपाध्यक्ष,तथ्य योद्धा आणि शिव स्वराज्य संस्थेच्या जिल्हा अध्यक्ष तसेच विविध संस्था पदाधिकारी असलेल्या समाज सेविका सौ.वैशालीताई ताई सौदांणे चव्हाण यांनी कोरोना काळात, ते आज पर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविले आहै.आज ही राबवत आहै.

यांच्या कामाची दखल घेत,13/2/21ला नाशिक येथील हॉटेल एस एस के सॉलिसिटर येथे कोटक लाईफ इन्शुरन्स चा कोरोना वोरिअर हा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आणि 14/2/21 रोजी देवळा येथे भारत विकास प्रबोधिनी या सामाजिक संस्थे चा कसमा दे भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच मागील आठवड्यात आदिवासी विकास संघ यांचा समाजरत्न या पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे होते. मा. माजी.उपजिल्हाधिकारी श्री.भागवतजी सौदांणे,श्री. मोतीलालजी सोनवणे, डॉ. योगेशजी सावळे,सौ कविता ताई कोळी,मा. संजय कोळी झोनल ऑफिसर श्री. नवीनजी,श्री.शामजी गोसावी, तसेच सौ.वैशाली पवार,सौ. मीनाताई देवरे, पोलीस अधिकारी मा. मातोंडकर साहेब(देवळा), आणि श्री विजयजी इंगळे व मॉडेल सौ.प्रियाया सुरते इतर मान्यवर उपस्थित होते.,या वर्षीचा सौ.वैशाली ताई यांच्या आस्था अनघादि फौंउडेशन या सामाजिक संस्थेचा वर्षभराचा उपक्रम आहै.वडील स्वर्गीय .बापुराव दौलतराव चव्हाण यांच्या कडुन प्रेरणा घेतलेला विषय म्हणजे झाडे लावा झाडे जगवा.,आणि आई स्वर्गीय.निर्मला बापुराव चव्हाण यांच्या कडुन प्रेरणा घेऊन महिला आणि आरोग्य या विषयावर उपक्रम राबवणार आहै.

वैशालीताई यांचे पती शिंदखेडा येथील तहसीलदार श्री.सुनीलजी सौदांणे हे आहैत.तर, मेडिकल ऑफिसर डॉक्टर.राजेन्द्र चव्हाण व पिलखोड चाळीसगाव येथिल प्रसिद्ध हस्तरेखा तज्ञ डॉक्टर जितेंद्र चव्हाण यांच्या त्या बघिनी आहैत.वैशाली ताई म्हणतात हे पुरस्कार माझे एकटीचा नसुन सर्व सहकारी यांचें देखील आहै.संस्था सदस्य किशोर ईशी, मंगला पिसे, आशुतोष चव्हाण,आदित्यवर्धन सौदाणे ,अनघा सौदांणे,राखी ईशी,महेश शवरे ,दिपक कोळी.आदी.यांचे आभार मानतात.व वरील पुरस्कार प्रदान करनाऱ्या सर्व संस्थे चे देखील मनःपूर्वक आभार मानतात.