नॉट रीचेबल “त्या” नेत्याला पक्ष व मंत्रिमंडळातून हाकलून द्या

  39

  ?पूजा चव्हाण प्रकरणी डॉ. माकणीकर यांची मागणी

  ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  मुंबई(दि.16फेब्रुवारी):-पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर राज्यामध्ये बंजारा समाज हवा तसा आक्रमक झाल्याचे चित्र दिसत नाही. मृत्य आत्महत्या की खून या बाबी पूर्णतः पुढे येऊन संबंधितांवर कडक शासन होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक रस्त्यावर येऊन लढा देणार असल्याचे माहिती राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी दिली.

  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रवक्ते वसंत कांबळे यांच्या देखरेखीखाली राष्ट्रीय युवा सचिव व बंजारा नेते विजय चव्हाण, बंजारा सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाई शिवा राठोड, राज्य महासचिव, प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ कांबळे, कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी पूजाला न्याय मिळवून द्यायची मागणी केली आहे.

  बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण हिचा पुण्यामध्ये उच्चभ्रू वसाहतीत संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तिला न्याय मिळवून देण्यासाठी बंजारा समाजाने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन रिपाई डेमोक्रॅटिक महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी बंजारा समाजाला केले आहे.

  भारतीय मुलगी म्हणजे आमची बहीन असे नाते जुळते, कुणी वाईट जरी नजर टाकली तर डोळे फोडण्याची क्षमता आर.पी.आय डेमोक्रॅटिक ठेवते, आमच्या आया बहिनि जर सुरक्षित नसतील तर सरकार उलथून टाकू, तसेच प्रकरणापासून नॉट रीचेबल असलेले नामदार यांना चौकशी होई पर्यंत पक्ष आणि मंत्री मंडळातून हाकलून द्यावे. असे पँथर डॉ. माकणीकर यांचे म्हणणे आहे.

  कर्तृत्वसंपन्न समजल्या जाणाऱ्या बड्या मंत्र्याचे नाव या प्रकरणात जोडले जात आहे. भालचंद्र नेमाडे यांनी बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले, त्या वृत्तीचा जाहीर निषेध पक्षाच्या वतीने करण्यात आला. कोणतेही राजकीय हेवेदावे न दाखविता न्यायासाठी समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे, असा आशावादही पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

  पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या ११ कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या असतांनाही तपास धीमा का?

  तपास यंत्रणेने निपक्ष व कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता चौकशी करावी व आरोपी कोणी का असेना कडक शासन करावे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सदैव भटक्या विमुक्त जाती-जमाती, रंजल्या गांजल्यांच्या संरक्षणार्थ उभी असून तपासात साशंकता दिसून आल्यास महाराष्ट्रात रिपाई डेमोक्रॅटिक बंजारा युवा नेते विजय चव्हाण व भाई शिवा राठोड यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन उभारू अशी माहितीही महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी केले.