न.प .ब्रम्हपुरी मध्ये कंत्राटदारांकडून कामगारांचे शोषण.

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.16फेब्रुवारी):- शासना कडून किमान वेतन कायदा नुसार वेतन घेऊन देयक प्राप्त करणारे सफाई कंत्राटदार कुठल्याही नियमावलीचा आधार न घेता कामगारांना मनमर्जीने मजुरी देतात व मागील सात महिन्या पासून एक हि रुपये मजुरी दिलेली नसल्याचा प्रकार नगर परिषद ब्रम्हपुरी येथे घडत आहे. सफाई कामगार वर्गाकडून अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन सामाजिक संघ टनेला प्राप्त झालेली तक्रार नुसार नगर परिषद कंत्राटदारांनी वेळी अवेळी नियमित कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकणे , त्याची पिळवणूक करणे, मजुरी देताना अनियमिता बाळगणे असे प्रकार नगर परिषद मध्ये वारंवार घडत आहेत.

सहायक कामगार आयुक्त चंद्रपूर कार्यालयातून हि अशा कंत्राटदारांन विरुद्ध वारंवार तक्रार करून सुद्धा कुठलीही कारवाई होत नसल्या ने पिडीत सफाई कामगारांनी पत्रा द्वारे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर , सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर ,सचिव कामगार मंत्रालय मुंबई , मुख्याधिकारी नगरपरिषद ब्रम्हपुरी , आदी मान्यवरांना तक्रार केलेली आहे व मागणी मान्यस योग्य न्याय न मिळाल्यास पिडीत कामगारांनी नगर परिषद समोर उपोषणाचा इशारा दिला आहे .