शिवनितीच भारताला महासत्ता बणवू शकते

24

छ.शिवरायांच्या भूमीत जन्माला आल्याचं अहोभाग्य ज्यांना ज्यांना लाभलं ते सर्व आपण भाग्यवान आहोत कारण शिवरायांच्या कर्तुत्व पराक्रमासह सर्व गुणाची जगाने दखल घेवून प्रत्येक क्षेत्रात त्यांचा रोलमाॕडल म्हणून जगभर स्वीकार केला आहे.विश्वाच्या नजरेतील शिवराय भारताच्या नजरेत उतरु शकले नाही ही आपली फार मोठी शोकांतीका आहे. याचं मुख्य कारण भारतात छ.शिवरायांचा इतिहास त्यांचा द्वेश करणाऱ्या पुर्वाश्रमीच्या विदेशींनी लिहीला. तर जगातील इतर इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगाल इरान इराक व्हिएतनाम…इ. देशांनी त्यांचा बघितलेला पराक्रम व कर्तृत्व अनुभवून इतिहास लिहीला म्हणून त्यांनी त्यांच्या देशात शिवनीती वापरून विकास साधला.परंतु दुर्दैवाने भारतात मात्र त्यांचा दैदीप्यमान इतिहास विदृप करुन आपसात धार्मिक द्वेष कलह निर्माण करण्यासाठी वापर केला. त्यांचा सामाजिक राजकीय संघर्ष हा धार्मीक संघर्ष म्हणून आपल्यापुढे मांडला. विश्वातील बहुतांश देशानी भारताकडून बुद्धाला व छ.शिवरायांना स्विकारुन त्यांनी त्यांचा विकास साधला परंतु भारतीयांनी आपल्याच या महान धरोहरांना पुर्वाश्रमी युरेशीयन विदेशींच्या कपटाला बळी पडून दूर केले व स्वतःचीच आपली महान संस्कृती विसरुन परजीवी शोषकांच्या मागे लागून स्वतःला गुलाम करुन घेतले.

डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वश्रेष्ठ भारताच संविधान निर्माण करतांना त्यांच्या नजरेसमोर शिवनीती होती. छ.शिवरायांचा राज्यकारभार डोळ्यासमोर असल्याने हे आदर्श संविधान निर्माण करण्यास मला कोणतीही अडचन गेली नसल्याचे बाबासाहेबांनी स्वतः सांगितले आहे.
म्हणूनच बाबासाहेब आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात ‘जय शिवराय’ शब्दाने करत एवढं घट्ट आदर्श नात त्यांच होतं परंतु आम्हा बहुजनांपर्यत खरे शिवराय बाबासाहेब पोहचू न देण्यात मनुवादी यशस्वी झाले.

🔸धर्मनिरपेक्ष छ.शिवराय
छ.शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले याचा अर्थ हिंदुंच राज्य निर्माण केलं असा नव्हे तर हिंद म्हणजे प्रजा, त्यांनी प्रजेचं राज्य निर्माण केलं. छ.शिवरायांच्या राज्यात जाती धर्माला अजीबात थारा नव्हता सर्व जातीधर्माच्या मावळ्यांना मराठा बिरुद देवून एका छत्राखाली आणून जातीवादाला त्यांनी तिलांजली दिली. छ.शिवरायांच्या सैन्यात मदारी मेहतर सारखा आग्र्यावरुन शिवरायांना सहीसलामत सोडवणारा निष्ठावंत मावळा, शिवरायांचा वकील काजी हैदर,आरमाराचा प्रमुख दौलतखान, शिवरायांच्या अंगरक्षकांचा प्रमुख सिद्धी इब्राहीम, चित्रकार दाऊद खान, निष्ठावंत सेवक मीर अहमद, अशाप्रकारे महत्वाच्या पदावरील मुसलमान अधिकारी व त्यांचे अर्धे अधिक अंगरक्षक व सैनिक मुसलमान होते. स्वतः आपल्या महालापुढे आपल्या मुसलमान मावळ्यांसाठी मज्जीद बांधणारा धर्मनिरपेक्ष राजा जगात दुसरा झाला नाही. कुराणाची एखादी प्रत कोण्या सैनिकाच्या हाती लागल्यास सन्मानाने मुसलमान व्यक्तीकडे सुपुर्द करण्याचे शिवरायांचे सैनिकांना फर्मान होते, यावरुन स्पष्ट आहे की त्यांचं राज्य धर्मासाठी अजीबात नव्हतं. छ.शिवरायांना एखाद्या धर्माशी जोडणं त्यांचा राजकीय संघर्ष हा धार्मीक संघर्ष आपल्यापुढे मांडणे म्हणजे त्यांच्याशी द्रोह करणे होय. असा द्रोह करणाऱ्यांना शिवप्रेमींनी ठेचून काढले पाहिजे कारण हा शिवरायांचा अपमान तर आहेच त्याचबरोबर त्यांचे महान कार्य व विचार संपविण्याचं कटकारस्थान आहे.

🔹विज्ञानवादी छ.शिवराय
छ.शिवरायांनी ३६१ किल्ले जिंकले व अनेक किल्ल्याचा जिर्णोद्धार केला परंतु एकाही किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही एवढेच नव्हे तर किल्ल्यावर कर्मंकांड किंवा सत्यनारायण होम हवन शुभाशुभ यज्ञ पंचाग राशी भविष्य मुहुर्त कुंडल्या पाहिल्याची कुठेही नोंद सापडणार नाही. अशुभ समजल्या जाणाऱ्या अमावसेच्या रात्रीच चढाया केल्या. पालथा जन्मलेला राजाराम अशुभ नसून मोगलाईला पालथी करण्यास जन्मा आला असे म्हणून अंधश्रद्धा लाथाडली. पित्याच्या निधनानंतर जिजाऊंना सती जाण्यापासून रोखून असल्या अनिष्ठ रुढी परंपरा उचनिच स्पृष्य अस्पृष्य भेदाभेदाने मानव जातीला धर्ममार्तंडांनी कलंकीत केललं साफ धुवून काढलं. ब्रम्ह हत्या पाप सांगणाऱ्या धर्मांध अंधश्रद्धेला अफजल खानाचा दगाबाज वकील कृष्णा भाष्कर कुलकर्णीला उभा कापून ही अंधश्रद्धा दुर केली. शुद्राने सागर उल्लंघन करणे पाप मानणारी अंधश्रद्धा सागरातच आरमार उभारुन मोडून काढली. धर्ममार्तंडांनी शुद्राला राजा बनण्याचा अधिकार नाकरला असला तरी लाख विरोध झुंगारुन सर्व गुलामीच्या शृखला तोडून राज्यभिषेक करवून शिवराय छत्रपतीचे छत्र धारण करुन राजे झाले.एवढेच नव्हे तर रयेतेचे आदर्श स्वराज्य निर्माण केले. माझ्या या राजाला शत्रू लाख कोशिष करुन हरवू किंवा मारु शकला नाही परंतु राजदरबारी पोसलेल्या काही विषारी कपटी राज्यकारभाऱ्यांच्या विरोध कट कारस्थानाने शिवरायांना अवघ्या पन्नास वर्षाच्या अल्प वयात जग सोडावं लागल. जर का छ.शिवराय व छ. संभाजी दोन्ही पितापुत्र राजे शतःयुषी झाले असते तर प्रत्येकाच्या घराला सोन्याची दारं असती. इंग्रजांची गुलामी सुद्धा भारताला पहावी लागली नसती.

🔸शेतकऱ्यांचे कैवारी छ.शिवराय
शेतकऱ्यांवरच खरंतर देश जीवंत असल्याचे छ.शिवरायांनी ओळखले होते. शेतीवर कर न लावता आजही देशात नाममात्र अत्यल्प शेतसारा म्हणून महसूल घेतल्या जातो ही पद्धत छ.शिवरायांनी सुरु केलेली होय. देशाच्या या पोशिंद्याची त्यांनी फार काळजी घेतली होती. छ. शिवरायांनी शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले होते. शेतीला पाणी, शेतीला कर्ज, संकट काळात कर्ज सारा माफ, एवढचं नव्हे तर आपल्या सैनिकांना शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये असे फर्मान काढणारा एकमेव राजा,म्हणूनच काय तर स्वराज्यात एकाही शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याची शिवराज्यात नोंद नाही. असा शेतकऱ्यांचा कैवारी राजा छ.शिवरायच.

🔹स्त्री सन्मानाचे महामेरु छ.शिवराय
परस्त्रीस मातेसमान मानणारे जगातले एकमेव राजे शिवराय. मुलीच्या अब्रुवर हात टाकणाऱ्या रांज्याच्या पाटलाचे हात छाटणारे शिवराय, लहुजी गायकवाड नावाच्या सरदाराने किल्लेदाराच्या पत्नीवर बलात्कार केल्याचे समजताच त्याचे डोळे काढणारे शिवराय,शत्रुच्याही स्त्री ची सन्मानाने साळीचोळी करणारे शिवराय,शत्रूलाही त्यांच्या स्त्रियांना शिवरायांच्या सैनिकांकडून कसलाही धोका नसल्याची खात्री असणारे शिवराय, ममतेच्या पान्ह्याने आपल्या बाळासाठी अधिर झालेली हिरकणी दुर्गम असा कडा उतरुन जाणाऱ्या हिरकणीचा सन्मान करुन त्या कड्याला हिरकणी बुरुज म्हणून नाव देणारे शिवराय.

🔸शिवरायांच्या खऱ्या इतिहासाशी गद्दारी
इतिहास रचला मावळ्यांनी परंतु तो लिहीला मनुवादी कावळ्यांनी.शिवरायांची जगदंब नाव असलेली तलवार भवानी मातेने दिली असल्याचे सांगून त्यांच्या शौर्य पराक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच काम या मनुवादी इतिहासकारांनी केले.
कडेकपारी सरसर चढाई करणाऱ्या यशवंत घोरपडे या बहाद्दर मावळ्याला यांनी यशवंती घोरपड करुन टाकलं. छ.शिवरायांच्या खऱ्या गुरु माॕ.जिजाऊ व त्यांना वयाच्या १२ व्या वर्षी छत्रपतीची पदवी देणारे जगदगुरु तुकाराम महाराज होते. परंतु शिवरायांशी एकदाही भेट नसणाऱ्या मुघलाचा हेर असणाऱ्याला शिवरायांच्या गुरुस्थानी ठेवले. दादु कोंडदेव या चाकराला त्यांचा गुरु बणविले. छ.शिवरायांचा राजकीय संघर्षाचा इतिहास हा हिंदु मुसलमान संघर्षाचा इतिहास असल्याचे आपल्यापुढे मांडले गेले. या इतिहासकारांनी कुळवाळी भुषण शिवरायांना गोब्राम्हण प्रतिपालक करुन टाकले. परंतु मराठा सेवा संघाच्या इतिहास संशोधनाने खरा इतिहास पुढे आणला.

विश्ववंदे शिवराय*
संपूर्ण विश्वाच्या काण्याकोपऱ्यात जगभर शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. विएतनाम सारख्या छोट्याशा देशाने छ.शिवरायांची युद्धतंत्र वापरुन बलाढ्य अमेरिकेला तब्बल २५ वर्ष जेरीस आणले. बालाढ्य अमेरीकेला पाठ दाखवून माघारी फिराव लागलं. म्हणूनच व्हियतनामचा राष्ट्राध्यक्ष प्रथम छ.शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होण्यास अधिर होतो व आपल्या देशात शिवरायांच्या चरणाची माती नेतो. व्हियतनामच्या हो-चि-मिन्ह या राष्ट्राध्यक्षाच्या समाधीवर शिवरायांचा मावळा इथे विश्रांती घेत आहे अशा अर्थाचे शब्द कोरलेले आहे. अशाच प्रकारे जर भारतीय राज्यकर्त्यांनी विषमतावादी पेशवाई ऐवजी आपल्याच या धरोहराची प्रेरणा घेवून जर समता मानवतावादी शिवनितीचा स्वीकार केला असता तर भारत नक्कीच आज महासत्ता असता.
*जिजाऊ शिवरायांच्या प्रेरणेचा शिवधर्म*
मराठा सेवा संघ या वर्तमान युगातील महान पुरोगामी चळवळीने आपल्या महान प्राचीन मातृसत्ताक निसर्गपुजक बळीशिवकृषीसंस्कृतीच्या खऱ्या आपल्या स्त्री सन्मानाच्या मातृसत्ताक सिंधुसंस्कृतील ‘शिव-पार्वती’ या आपल्या मुळ आध्य गणनायकाच्या लुप्त झालेल्या शिवधर्माचे थोर तत्वज्ञ आ.ह.साळुंखे, अॕड.पुरुषोत्तम खेडेकर …यांच्या सारख्या थोर विचारवंत साहित्यिक इतिहास तज्ञांनी प्राचीन साहित्याचे अभ्यासपूर्ण चिकित्सक सखोल संशोधन करुन माॕ.जिजाऊंना प्रेरणास्थानी ठेवून शिवधर्माचे प्रकटन केले.आचरणासाठी ‘शिवधर्म गाथा’ उपलब्ध करुन दिली. बहुजनांना भयमुक्त भटमुक्त करुन धार्मिक शोषणातून मुक्तता दिली आहे.
प्रत्येक शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव हा नाचून नाही तर वाचून,शिवरायांना डोक्यावर घेवून नाही तर डोक्यात घालून विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करावा.

✒️शब्दांकन तथा लेखन:-रामचंद्र सालेकर(राज्यउपाध्यक्ष
शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र)मो:-9527139876
————-