शिवजयंती दिनी चार्वाक वनात धम्मभूषण, ॲड .आप्पाराव मैंद लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

  36

  ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

  पुसद(दि.17फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्याचे निर्माते आणि मराठी जनतेचे ह्रृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव दि.१९ फेब्रु.२०२१ रोजी सकाळी १०-३० वाजता, म.फुले समता विचार मंच बहु.शैक्षणिक संस्था पुसदच्या वतीने ,चार्वाक वन ता.पुसद येथे थाटामाटाने साजरा करण्यात येणार आहे.

  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री रामरावजी वडकुते,माजी आमदार हिंगोली हे भुषविणार असून शिवचरित्रावर उद्बोधक मार्गदर्शन, प्रमुख वक्ते मा.प्रा.डाॕ.यशपाल भिंगे, नांदेड हे करणार आहेत.तसेच शिवजयंती उत्सवास मा.श्री संभाजीराव धुळगुंडे ,माजी अध्यक्ष जि.प.नांदेड आणि मा.अॕड.शिवाजीराव हाके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

  ‘छत्रपती संभाजी महाराजाला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनीच दिलरखानाला फितूर होण्यास सांगितले होते आणि तो एक गनिमी काव्याचा भाग होता,असे मराठी जनतेच्या मनात एका ब्राम्हणी षडयंत्राने भरले आहे.

  अर्थातच ते चूकीचे असून ब्राह्मण कारभा-यांना छळाच्या आरोपातून मुक्त करण्यासाठी रचलेले ते एक षडयंत्र आहे.ते कोणी ,का रचले आणि त्याचा प्रसार कसा केला याचा पर्दापाश करण्यासाठी अॕड.अप्पाराव मैंद यांनी ‘ ‘महाराजांनीच संभाजीला दिलेरखानाकडे पाठविले-षडयंत्र ‘ या शिर्षकाखाली पुस्तक लिहिले आहे.त्या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्याच्या हस्ते शिवजयंती उत्सवात करण्यात येणार आहे.तरी, शिवजयंती उत्सवात शिवप्रेमीनी उपस्थित राहावे अशी विनंती संस्थेचे सचिव सुभाष दायमा यांनी केले आहे.