सेवालाल महाराज जयंती थाटात साजरी

39

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.17.फेब्रुवारी):-संत सेवालाल 282 वी जयंती निमित्त चंद्रपूर येथे वसंतराव नाईक चौकात थाटात साजरी करण्यात आले. त्यावेळी उपस्थित नगरसेवक सुभाष कासनगोटूवार यांच्या विशेष प्रयत्नातुन सौंदर्य करून 15 फेब्रुवारी ला संत सेवालाल जयंती निमित्त प्रा.विश्वनाथ राठोड यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उदघाटक म्हणून चंद्रपूर महानगरपालिका चे स्थायी समिती सभापती श्री. रवी आसवानी,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोकभाऊ राठोड,प्रदेश अध्यक्ष, भा.बं स.क.से.संस्था. प्रमुख उपस्थिती श्री.तुकाराम पवार, अध्यक्ष जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ. सौ.मंजुश्री कासनगोटूवार, अध्यक्ष, मुक्ती फाउंडेशन. श्री पुरणसिंग चव्हाण, इंजी.संजय राठोड, श्री नवनाथ गायकवाड, सुप्रसिद्ध समोंहन तज्ञ मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा.विश्वनाथ राठोड यांनी संचालन व प्रास्ताविकातून संत सेवालाल महाराजांचे जीवनचरित्र,उपदेश, निसर्गाच्या समतोल राखण्यासाठी केलेल्या कार्यातून व मानवाला दिलेल्या समतेच्या संदेशाचे महत्त्व लक्षात आनुन दिले आणि वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकासात नाईक साहेबांच्या योगदानाबद्दल अवगत केले.

मा.तुकाराम पवार यांनी यावेळी उपस्थित समुदायाला संबोधित करतांना वसंतराव नाईक यांच्या पुर्णाकृती पुतळा चंद्रपूर येथे उभारण्याकरीता प्रयत्न करण्यात येईल याचे आश्वासन दिले, श्री.सुभाष कासनगोटूवार यांनी नगरसेवक म्हणून तुकुम प्रभागात या चौकाचे सौंदर्य व लोकार्पणहा मानाचा तुरा ठरेल असे वाटते. श्री रवि आसवानी यांनी बंजारा समाजातच नव्हे तर ईतरानाही प्रेरणा देणारे संत सेवालाल च्या नतमस्तक होऊन शुभेच्छा दिल्या आणि वसंतराव नाईक चौकाचे लोकार्पण झाल्याचे जाहीर केले पुढे सर्व प्रकारच्या मदतीला आपण बंजारा समाजाच्या सोबत राहील असे आश्वासन दिले.यानिमित्ताने आयोजित मोटरसायकल रॅली काढण्यात आली वसंतराव नाईक चौक,सावरकर चौक,बसस्टॉप, जटपुरा गेट,मिलन चौक,गांधी चौक,प्रियदर्शनी चौक वरोरा नाका चौक ,पडोली आणि चिंचाळा येथे बंजारा समाजानी बांधलेल्या श्री जगदंबा व संत सेवालाल वाचनालय व मंदिरात जगदंबा प्राणप्रतिष्ठा व सेवालाल पागडी खडाऊ ज्योत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

या कार्यक्रमात सौ.मंजुश्री कासनगोटूवार यांचा विशेष ” पामळीं ” या मानाच्या सत्काराने सन्मान करण्यात आले. सुप्रसिद्ध समोहन तज्ञ श्री नवनाथ गायकवाड, कार्यकारी अभियंता श्रीपती चव्हाण, भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था प्रदेश अध्यक्ष श्री अशोकभाऊ राठोड यांनी विचार व्यक्त केले प्रसंगी. इंजी.सजंय राठोड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला .मायाताई मंदाडे,सौ अनिता राठोड, सौ.उमा राठोड, सौ.शांताबाई राठोड, श्री वसंराव धंदरे,श्री जिलानी श्री जाधव,चव्हाण, श्री.चौबे.श्री जोगी,इंजी.अडकिने प्रा संजय पवार, पुरणसिंग चव्हाण, विठ्ठल जाधव, उपस्थित होते यावेळी बंजारा समाजातील पुरुष व महीला मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रा विश्वनाथ राठोड यांनी संचालन तर श्री.मरलीधर राठोड व प्रा.सजय पवार यांनी आभार मानले ,कार्यक्रम आयोजित करण्यात श्री एन.टी राठोड, श्री नानुराम चव्हाण श्री बबनराव जाधव, मुलीचंद आडे,गणेश आडे,वसंत राठोड, सुजित जाधव, मोतिसिंग चव्हाण, विठ्ठल जाधव नारायण चव्हाण, जयदिप राठोड ,नरसिंह बादावत,बालाजी जाधव,दयानंद राठोड यांनी विशेष प्रयत्न केले