नासिकसिविल हॉस्पिटल मधील चिमुकलीला चोरणारा केला जेरबंद

23

✒️निफाड प्रतिनिधी(विजय केदारे)मो:-9403277887

नाशिक(दि.17फेब्रुवारी):- सिव्हिल हॉस्पिटल मधून तीन दिवसापूर्वी दीड वर्ष च्या चिमुकलीचे अपहरण करणारा अखेर जेरबंद झाला आहे सरकार वाडा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे पहाटेच्या सुमारास सीबीएस परिसरात चिमुकली आढळून आली या चिमुकलीला सोडून अपहरण करता फराळ झाला होता पण तू पोलिसांनी त्याचा माग काढला जेरबंद केलेल्या संशयित सुरेश माणिक काळे असे नाव आहे त्याने चिमुकलीला अपहरण का केले यासह अनेक बाबींचा उलगडा तपासात होणार आहे व न्यायालयात त्याला हजर केले जाणार आहे गेल्या शनिवारी भरदिवसा दुपारी दोन वाजता दीड वर्षाच्या मुलीला एका भामट्याने हॉस्पिटल मधून पळून नेले होते हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला होता.

प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या दीड वर्षाच्या मुलीला भामट्याने सिविल हॉस्पिटल मधील पहिल्या मजल्यावरून पळविले होते अपहृत मुलीला घेऊन तिची आई व मावशी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आली होती बाळंतपणासाठी मुलीची आई धावपळ प्रसूतीसाठी करीत होती त्यावेळेस मुलगी झोपत असताना आईने तिला प्रसुती कक्षाबाहेर झोपविले दोनच्या सुमारास आई बाहेर आल्यानंतर मुलगी दिसली नाही आईने इतरत्र शोधाशोध सुरू केली मात्र ती आढळून आली नाही रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक व्यक्ती मुलीला खांद्यावर झोपून घेऊन जाताना आढळला