नगर परिषदेच्या यंञणा गूलदस्त्यात स्वच्छता टेंडर वाल्याचे तिन तेरा – संघर्ष प्रतिष्ठान

    43

    ✒️समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी)मो:-8552862697

    माजलगाव(दि.18फेब्रुवारी):- शहरातील नगरपरिषदेने स्वच्छ माजलगांव सूंदर माजलगाव बनवण्यासाठी १डिसेंबर ते अद्याप पर्यत टेंडर ने सूरूवात केली जवळपास तिन महीण्याचा कालावधी उलटत असतानाही टेंडरवाल्याचे तिन तेरा इथल्या प्रशासनाने वाजवले असून ,टेंडरचे कसलेच बील सूध्दा अदा केले नाहीत.म्हणून रोजंदारीवर काम करणारे आज दोन दिवस झाले काम बंद करून बसले असल्यामूळे माजलगाव नगर परिषदेचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला असून टेंडरवाले देशमूख पूर्णपणे उदास झाले आहेत.

    स्वखर्च्यातून मजूरांचे पगार केले असून तो खर्च निघण्या संदर्भात टेंडर प्रमूख देशमूख यांना मोठ्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.कंञाट पध्दत पूर्ण राज्यात लागू असुन माजलगाव मध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या नाकर्त्या धोरणामूळे रोजगारावर उपासमारीची वेळ येत असुन न.प.प्रशासनाने बील अदा करावे व होणारी हेळसांड मजूरांची थांबवावी अशा आशयाची मागणी प्रसिद्धी पञकान्वये माध्यमाद्वारे संघर्ष प्रतिष्ठानच्या वतिने केली आहे.