लोकशाही आणि घराणेशाही

31

भारतीय लोकशाही व्यवस्थेला पंचेचाळीस वर्षांचा इतिहास आहे एका प्रदीर्घ लढयातून आपले आपले लोकशाही समाजवादी गणराज्य आकाराला आला आहे प्राचीन भारतात लोकशाहीचा व्यापक प्रयोग नव्हता एतधेशीय सत्तेची राजवट असताना नव्या विचारांचा उदय झालेला नव्हता स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ह्या खंडप्राय देशात सहासे पेक्षा जास्त संस्थाने होती त्यापेक्षा अधिक होती त्यांची प्रत्येकाची स्वतंत्र व्यवस्था होती.राज्य करण्याची पध्दती आणि त्यामधील व्यवहार भिन्न होता हया ऐयधेशीय सत्ता मध्ये एक समान धागा होता तो म्हणजे ग्राम राज्य. होय ग्राम राज्यांनी प्राचीन हिंदू धर्मातील जातीव्यवस्था टिकवून ठेवली होती एतधेशीय राजा किंवा सत्ताधीश व ग्राम राज्ये ह्यांच्या संबंध हा केवळ सारा व महसुली उत्पादनापुरता मर्यादित होता.

ग्राम राज्य प्रमुख हा पाटिल किंवा देशमुख असे तो आपल्या राज्याला म्हणजे राजाला गावचा महसुली वाटा देत असे ह्या महसुली उत्पन्न बदल्यात राजाने लोकांचे परकिय आक्रमणा पासून संरक्षण करावे ही अपेक्षा असे म्हणजे सुव्यवस्था आणि रक्षणासाठी.पोलिस राज्य.हेच प्राचीन एतधेशीय सत्ताच मुख्य उद्दिष्ट होते सत्ता कोणाची आहे यात ग्रामसभेला रस नव्हता.
आपल्या शेती उत्पन्नाचा विशिष्ट वाटा गावच्या पाटलाकडे किंवा वतनदार देशमुख यांचेकडे देणे एवढंच त्यांना माहीत होते प्रत्यक्षात महसुली वसुलीचे काम गावातील कुलकर्णी करत असत ह्या काळातही अमलखालील प्रजेचे संरक्षण करण्याची जबाबदारीही राज्यकर्ते यांचेवर असलीतरी ते हि जबाबदारी चोखपणे बजावतीलच असे मात्र नाही उलट हे सर्वजण मिळून आपल्याच रयतेची लूटमार करण्यात ऐयधेशीय सत्याचा पुढाकार होता सारा वसुली वेळेत झाला नाही तर राजांचे सैनिक गावातील मालमत्ता महिलांना त्रास आणि गावाच्या गावे लूटत असतं शिवाय पाटील वतनदार देशमुख कुलकर्णी ह्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे जनतेला कोणी वालीच उरला नाही हि परस्थिती सर्वसाधारण इ स १८१८ पर्यंत अशीच राहिली.

इ स १८१८ मध्ये व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले त्यांनी मराठ्यांचा पराभव केल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानात इंग्रज सत्तेचा अमंल सुरू झाला हि एक नवीन राजवट होती नवी राजवट ह्या अर्थाने की ह्या सत्तेने नव्या प्रथा व पध्दती सुरु केल्या उदाहरण. सारावसुलीच्या पारंपारिक पद्धतीत रयत धान्याच्या स्वरुपात राजाला सारा देत असे ब्रिटिशांनी हि पध्दत बदलून रोख पैसा ह्या स्वरुपात सारावसुलीची पध्दती सुरु केली त्यांनी जनतेला लूटणारया ठग. पेंढारी. ह्याच्या पूर्ण बीमोड करून शांतता व सुव्यवस्था व कायद्याचे राज्य प्रस्थापित केले आणि महसूल व राज्य व्यवस्थेत अनेक कायदे करून हळूहळू नवी चौकट उभी केली नव्या राज्यव्यवस्थेसाठी प्रशासन वर्ग स्थापन केला व न्यायदानासाठी न्यायालये सुरू केली ह्यामुळे आपल्याला नव्या राज्य व्यवस्थेचा परिचय झाला. ब्रिटिशांनी जी पद्धती राबवली किंवा राबवण्याचा प्रयत्न केला त्यामागे ब्रिटिश संसदीय पद्धतीचा मोठा प्रभाव होता हया नव्या बदलातून लोकशाहीचे नवे विचार भारतवाशीयांना कळले आणि घराणेशाहीचा समूळ नायनाट झाला. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पहिल्या पिढीला हे नवे विचार लोकशाही संकल्पना समजून घेण्याची संधी मिळाली.

स न १८५७ मध्ये काही भारतीय सेनानी सैनिक समाजसेवक. क्रांतिकारी यांनी ऐयधेशीय सत्तांनी विचारानी बंड करून आव्हान दिले ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्यासाठी प्रयत्न केला परंतु हा प्रयत्नाला अपयश आले भारतीय असंतोष कमी करण्यासाठी १८५८ मध्ये राणीचा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला या जाहिरनामा मध्ये अनेक आश्वासने देण्यात आली आणि १८५८ मध्ये ब्रिटिश संसदेने कायदा करुन ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात आणली.इंग्रज गेले आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण आपल्यातली घराणेशाही अजून जशी होती तशीच राहिली एका ठिकाणी एकाच घरातील घराण्यातील व्यक्ति अजून आपल्यावर राजे गेले राजपाठ गेले पण सर्वसामान्य जनतेवर राज्य करणारे तेच आहेत लोकशाही माध्यमातून आपणास विविध अधिकार दिले आहेत पण अजून यांचा वापर आपणास कळालेला नाही अमुक स्वातंत्र्य तमुक स्वातंत्र्य पण ते कागदावरच. विविध कर्ज योजना पण अट जातींचा दाखला कि जे सर्वसामान्य पूर्ण करु शकत नाहीत आत्ता जागायची गरज आहे.

✒️लेखक:-अहमद नबीलाल मुंडे(९८९०८२५८५९)संस्थापक अध्यक्ष रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा