छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी

57

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.19फेब्रुवारी):-छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी प्र. तहसिलदार किशोर भाडांरकर, जिल्हा नाझर डी.ए. ठाकरे, श्री. सोरते, व्ही.बी.दुधबळे, महेंद्र वट्टी, श्री. चहांदे, जिल्हा माहिती कार्यालयातील मनोहर बेले आदि. कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

उपस्थित सर्व अधिकारी / कर्मचारी, वृंदानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
*****