ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी चे एकदिवसीय धरणे आंदोलन

72

✒️राहुल कासारे(अंबेजोगाई प्रतिनिधी)मो:-9763463407

अंबाजोगाई(दि.19फेब्रुवारी):-देशात ५२टक्के लोकसंख्या असताना ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही त्यामुळे ओबीसी समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्षे होऊन गेली तरी या देशातील लोकसंख्येच्या एकूण 52 टक्के च्या वर असलेला ओबीसी समाज आज ही काही अपवाद वगळता आर्थिक, सामाजिक राजकीय दृष्ट्या कमकुवत आहे.
वर्षानुवर्षे येथील राज्यकर्त्यांनी येथील ओबीसी समाजाची दिशाभूल करूण सत्तेचा ओबीसी समाजाविरुद्ध करुण नेहमी समाजाची दिशाभूल केली आहे.देशाच्या स्वातंत्र्य काळापासून आजतागायत कधीच ओबीसी समुहाची जातीनिहाय जनगणना झाली किंवा करण्याची इथल्या राजकर्त्यांनी तसदी दाखवली नाही.

त्यामुळे ओबीसी समाजाचे आर्थिक व सामाजिक नुकसानीला ओबीसी समाज बळी पडला आहे म्हणून च वंचित बहुजन आघाडी च्या वतीने ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी या प्रमुख मागणीसह इतर अन्य मागण्यांसाठी अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई तालुका अध्यक्ष संजय तेलंग यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी १८फेब्रुवारी रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले असता सदरील मागण्या पुढीलप्रमाणे अशा की,ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात यावी, नॉन क्रिमिलियर अट रद्द करण्यात यावी, तालुकानिहाय मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात यावे,ओबीसी साठी घरकुल योजना राबविण्यात यावी, ओबीसी साठी स्वतंत्र आर्थिक विकास मंडळाची स्थापना करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह विविध मांगण्यासाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे बीड जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ डोंगरे, वंचितचे राज्य महासचिव भीमराव आबा दळे,वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र भाऊ कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजित रोडे, जिल्हा महासचिव मिलिंद जी घाडगे, ज्येष्ठ मार्गदर्शक ऍड.सतीश काळम पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छायाताई हिरवे, शोभाताई जाधव, संगिता ताई कांबळे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष संजय तेलंग,शहराध्यक्ष अमोल दादा हातागळे, खाजामियाँ पठाण, प्रकाश वेदपाठक, पत्रकार राहुल कासारे,गोविंद मस्के, रफिक कुरेशी, दिगंबर राऊत, आजम खान, नाथराव पाळवदे, ऍड सुभाष जाधव , तुकाराम देवळकर, यांच्यासह वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.या धरणे आंदोलनाला अँड.अनंतराव जगतकर,सुखदेव भुंबे,दत्तु कांबळे, अंजली ताई पाटील यांच्यासह संभाजी ब्रिगेड व विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे.