वाघळा ता.उमरी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार संपन्न

84

✒️शिवानंद पांचाळ(नायगांव प्रतिनिधी)मो:-९९६०७४८६८२

नायगाव(दि.19फेब्रुवारी):-नवनिर्वाचित सरपंच सौ.कविता बालाजीराव नासलवाड,सौ.यशोदा सदाशिव हलगुंडे,ओबीसी,उपसरपंच सौ. ललिता वसंत राठोड,बंजारा,सौ. सुरेखा शिवाजी शिंदे,सदस्य ओपन,श्री वसंत लालसिंग जाधव,बंजारा,श्री मारोती सायबू पोलेवाड,एस टी, सदस्य हे बहुमताने निवडून आल्याबद्धल आणि ह्या पॅनल ला मार्गदर्शन करणारे ,विजयाचे शिल्पकार श्री शेख लालनसाब,श्री हणमंत चिलमवाड,श्री अशोक हूलगुंडे यांचा ही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरीचे नेते व सुप्रसिद्ध उद्योजक श्री मारोतीराव कवळे गुरुजी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसींचे नेते श्री राजेश रापते व उमरीचे सुपुत्र श्री राजकुमार श्रीरामवार हे उपस्थित होते.

या प्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री दत्तराम पाटील,शिरूर चे सरपंच श्री आत्तमराव,बितनाळा छावाध्यक्ष श्री दत्ताहरी पाटील, आणि गावकरी मोठ्यासंख्येने उपस्थित राहून ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.