हिंगणघाट येथे २१ फेब्रूवारी रोजी आयोजित ज़िल्हास्तरिय ओ बी सी आरक्षण हक्क परिषद स्थगित

50

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनीधि)मो:-9923451841

हिंगनघाट(दि.20फेब्रुवारी):- येथे दिनांक २१ फेब्रूवारी रोजी होणारी ज़िल्हास्थरिय ओ बी सी आरक्षण हक्क परिषद कोरोना संक्रमनाचे पार्श्वभूमीवर स्थागित केल्याची माहिती प्रा शेषकुमार येरलेकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी माज़ी आमदार राजू तिमांडे,प्रा सुधीर पांगुळ, भूषण पिसे,रोहित हरने, अक्षय इंगोले,गोपाल माण्डवकर,महेश खडसे आदि पदाधिकारी उपस्तित होते.

जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ज़िल्ह्या प्रशासनाने ज़िल्ह्या प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून प्रतिबंध लावलेले आहेत. ही बाब लक्षात घेऊन ओ बी सी समाजाला त्यांची सुरक्षा व स्वास्थ्य लक्षात घेऊन तसेच ज़िल्ह्या प्रशासनाला सहकार्य देंण्याचा निर्णय घेऊन दिनांक २१ फेब्रूवारी रोजी डायमंड पैलेस येथे होणारी परिषद स्थगित करण्यात आली असुन प्रशासनाने प्रतिबंध शिथिल केल्यानंतर कार्यक्रम घेण्यात् येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.