छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सावात साजरी

28

✒️हवेली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

हवेली(दि.20फेब्रुवारी):- छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत,सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आर्वी गावात साजरी करण्यात आली.सद्गुरू सेवा प्रतिष्ठान पुणे,जयआंबेमाता स्वयंरोजगार संस्था,पुणे यांच्यामार्फत गावातील वृद्ध,ज्येष्ठ नागरिकांना स्वेटर वाटप करण्यात आले तर गरीब व गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.तसेच सद्गुरू सेवा प्रतिष्ठान,वारजे,पुणेच्या ‘गाव तेथे ग्रंथालय’उपक्रमातर्गत आर्वी गावात वाचनालय स्थापन करत तब्बल 150 पुस्तके गावाला भेट देण्यात आली.

यावेळी जय अंबेमाता स्वयरोजगार संस्था पुणेच्या अध्यक्षा मा.मंगलाताई नागुल,सद्गुरू सेवा प्रतिष्ठान,पुणे चे संस्थापक श्री.सचिन म्हसे सर,गावचे सरपंच श्री. चेतन जाधव,उपसरपंचं श्री.सागर घोगरे यांच्यासह गावातील प्रतिष्टीत महिला,नागरिक,जि.प.शाळेचे शिक्षकवृद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.