
✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439
नाशिक(दि.20फेब्रुवारी):-मविप्र समाजाचे जनता माध्यमिक विद्यालय लोखंडवाडी येथे शिवजयंती करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमेटीचे अध्यक्षस्थानी जनार्दन तात्या उगले होते.प्रमुख पाहुणे माजी सरपंच संदीप उगले,रामराव जाधव, माजी उपसरपंच सुभाष आरगडे,उपसरपंच कैलास लोखडे,नवनाथ उगले, विठ्ठल वरपे, उत्तम उगले, भास्करराव गायकवाड, महाले, ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री सर्वेश पाटील , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .वडजे आर. सी. होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या व प्रमुख पाहूणे यांच्या हस्ते शिवाजी महाराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
इयत्ता ८वी ची कु.आरती देविदास उगले, कु.प्रतिक्षा बैरागी यांनी शिवाजीमहाराज यांचे कार्याविषयी माहिती दिली. शिक्षक मनोगत श्री . चौधरी सी. एस. यांनी शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती सांगितली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. वडजे सर यांनी आपल्या भाषणात – शिवाजीमहाराजांच्या बालपणापासून ते हिंदवी स्वराज्य स्थापने पर्यंतचा त्यांचे संपूर्ण कार्य आपल्या मनोगतात व्यक्त केले.आले.सदर कार्यक्रम इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कु. योगिता थापा,धनश्री उगले, यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक चौधरी सी ,एस, शाह एस एम,निकम बी.व्ही.,पाटील एस.एस.,उगले के.एम.भाऊसाहेब, चव्हाण मामा,वाघ , उपस्थित होते.