वेल्हाणे येथे शिव जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धा

27

✒️वेल्हाणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वेल्हाणे(दि.20फेब्रुवारी):-:- धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथे शिवजयंती निमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अगोदर शिवरायांची महाआरती करण्यात आली.आरतीचा मान हा वेल्हाणे जेष्ठ व्यक्ती वेडु शंकर मराठे यांना देण्यात आला.त्या नंतर स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमानंतर लगेचच बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेत अनिल अर्जुन आयनार यांने प्रथम क्रमांक मिळवला. तर द्वितीय क्रमांक स्नेहल गुलाब मराठे तृतीय क्रमांक अनिल ज्ञानेश्वर बागुल यांनी मिळवला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व पर्यवेक्षक म्हणून श्री. बी. आर्.पवार व श्री. आय्. पी. राजपूत सर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला अनेक वेल्हाणेकर ग्रामस्थ उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन रुद्र छावा ग्रुप व मराठा समाज वेल्हाणे यांच्यावतीने करण्यात आले होते.