सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीमध्ये नवीन पदाधिकारी नियुक्ती

56

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.20फेब्रुवारी):- सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीमध्ये सातारा जिल्ह्याच्या नवीन पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमांमध्ये नामदार पृथ्वीराज बाबा चव्हाण (माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते जिल्हा पदाधिकार्‍यांच्या व तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देण्यात आल्या.

या प्रसंगी सातारा जिल्ह्याचे प्रभारी अनुसूचित जाती विभाग विजयकुमार भास्कर भोसले, जिल्हाध्यक्ष मनोजकुमार तपासे, अनुसूचित जाती विभाग सिद्धार्थ दैठणकर उपाध्यक्ष सातारा जिल्हा अनुसूचित जाती विभाग उपस्थित होते अनुसूचित जाती च्या प्रश्नांविषयी पदाधिकाऱ्यांशी बाबांनी सविस्तर चर्चा केली व अनुसूचित जातीच्या पदाधिकाऱ्यांना विशेष वेळ दिला व आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या निवडणुका बद्दल विशेष सूचना दिल्या.