चिंचखेड येथे शिवजन्मोत्सव उत्साहपुर्वक साजरा

30

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.20फेब्रुवारी):-१९ फेब्रुवारी २०२१ रोजी जि.प.प्राथमिक चिचंखेङ येथे शाळेत सालबादा प्रमाणे या वर्षी ही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रम प्रसंगी चिंचखेड गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच सौ.गुबांडे ताई व उपसरपंच श्री.रावसाहेब आबा पाटील व बालशिवाजी महाराज यांच्या भुमिकेत चि.वेदांत योगेश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.दत्तात्रय ढुमणे व सर्व ग्रामपंचायत सदस्य , शा.व्य.स.सदस्य ,शिवप्रेमी युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते ,गावातील शिवभक्त तरुण मंडळ ,प्रतिष्ठित नागरिक,मुख्याध्यापक श्री.संजय चौधरी व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी भगवे फेटे मुलींनी भगव्या साड्या परिधान केल्या होत्या एकंदरीत संपूर्ण शाळेचा परिसर शिवमय दिसत होता.