येवल्यातील आत्मा मलिक गुरुकुलात ३९१ वी शिवजयंती उत्साहात साजरी

39

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.20फेब्रुवारी):-येवला येथील आत्मा मलिक इंग्लिश मिडियम गुरुकुलामध्ये ३९१ वी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे येवला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री. सुरज पटणी व आत्मा मालिक ध्यानपीठातील महाराज संत चरणदासजी महाराज (संत कंकाली बाबा )हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. या नंतर इ.५ वी. ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून शिवाजी महाराजांचे बालपण व त्यांनी स्वराज्या स्थापने साठी केलेले प्रयत्न या संपूर्ण गोष्टी जणू डोळ्यासमोर उभ्या राहिल्या .इ.५वी. च्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज या नावा मधील प्रत्येक अक्षरांमध्ये दडलेला गहन अर्थ स्पष्ट करून सांगितला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सूरज पटणी यांनी आपल्या भाषणामध्ये मुलांना समजावून सांगितले की शिवाजी महाराज यांनी कधीही जाती धर्मामध्ये भेदभाव केला नाही व जे जाती जातीधर्माचे राजकारण करतात अशा लाेकांसाठी शिवाजी महाराजांवर असलेली कविता *मित्रा तुझा माझा तील फरक तुला सांगताे. . . .* सादर केली.शाळेचे प्राचार्य श्री.कापसे सर यांनी आपल्या भाषणा मध्ये महाराजांच्या जीवनातील प्रसंगाद्वारे ते महिलांचा आदर कशा पध्दतीने करत असत हे सांगितले व सर्व विद्यार्थी व पालकांना *शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा* दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साै.राजश्री भोसले मॅडम व सौ. सुरश्री रसाळ मॅडम केले. आलेल्या पाहुण्यांचे आभार साै.वैशाली पवार मॅडम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.कापसे सर, सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.अशाप्रकारे गुरुकुलामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली .