आमदार श्र्वेताताई महाले यांनी घेतली प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अधिकारी व नागरिकांची बैठक

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलढाणा(दि.20फेब्रुवारी):- आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून बुलढाणा जिल्हयात कोरोना विक्राळ रूप घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे . आजची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 300 एव्हढी झाली असून वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनक आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार बघता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अधिकारी व नागरिकांची बैठक घेण्यात आली.
बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट उसळली असून वाढणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने बैठक बोलावून कोरोना प्रतिबंध उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी केले.

झालेल्या बैठकीमध्ये पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे , उपसभापती सौ शमशाद बी पटेल,सतीश गुप्त अध्यक्ष चिखली अर्बन ,भाजपा शहराध्यक्ष पंडित दादा देशमुख तालुका अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ , कुणाल बोन्द्रे, , सुधीर चेके पाटील , तहसीलदार डॉ अजितकुमार येळे, मुख्याधिकारी अभिजित वायकोस , ठाणेदार गुलाबराव वाघ , आरोग्य अधिकारी डॉ खान , सौ सुरेखाताई गवई सदस्य पंचायत समिती,शिवराज पाटिल ,काँग्रेस शहराध्यक्ष अतरोद्दीन काझी ,राष्ट्रवादी शहराध्यक्ष रवी तोडकर , नगरसेवक दिपक खरात,श्रीराम झोरे शिवसेना शहर प्रमुख, विनायक सरनाईक , नितीन राजपूत, गोपाल आप्पा शेटे, राकेश चोपडा , मुन्ना बैरागी ,जीवन बाहेती, अरुण भोलाने अशोक भोलाने, सुधीर काळावाघे, शरद गिरी ,मनोज बैरागी , डी जे जयस्वाल , सुधीर काळवाघे , विष्णू जाधव , ज्ञानेश्वर बिडवे , दिलीप शितोळे , वैभव रमेश सपकाळ , अशोक अग्रवाल , गोपाल काळे ,, दिलीप जाधव , किरण पवार , सौरव कुलकर्णी , आनंद इंगळे , प्रवीण पडघान , स्वप्नील तायडे विनोद नागवणी , सुनील पारस्कर आणि अनेक नागरिक, व्यापारी व अधिकारी उपस्थित होते.

यामध्ये सर्व नागरिकांनी कोरोनाचा वाढता प्रसार पाहता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे , मंडप डेकोरेशन मंगल कार्यालय यांनी कुठल्याही कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होऊ देऊ नये , सर्व बँकांनी , व्यापाऱ्यांनी आपापल्या संस्थांमध्ये मास्क व सोशल डिस्टंसिंग ची सक्ती करावी , बँकेतील कर्मचारी व सर्व व्यापारी तसेच जनतेच्या संपर्कात येणार्‍या लोकांनी दर पंधरा दिवसांनी स्वतः तपासणी करावी , बाजारपेठांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी पोलिस व नगरपरिषद यांची पथके नेमुन सोशल डिस्टंसिंग बाबत जनतेस प्रवृत्त करावे , मास्क न घालणाऱ्या व्यक्तीवर दंड लावण्यात यावा.

भाजीपाला विक्रेते दुकानदार यांनी स्वतः मास्क वापरुन ग्राहकांशी मास्क शिवाय व्यवहार करू नये , कुठल्याही कोविड पॉझिटिव रुग्णास घरी ठेवू नये , खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी कोविड सदृश्य रुग्णांना तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवावे , वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने covid-19 केअर सेंटरची क्षमता वाढविण्यात यावी , जनतेने स्वतः जबाबदारी घेत मास्क , सॅनिटायझरचा वापर करावा व सामाजिक अंतराचे पालन करावे लक्षणे दिसताच क्षणी तपासणी करावी असे आवाहनही या बैठकीदरम्यान करण्यात आले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED