खा.सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा ‘बहुजन’ पत्रकार संघटनेच्या वतीने “जाहीर निषेध

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.21फेब्रुवारी):-सातारा येथील राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा येथील “पावसातील” निवडणूक प्रचारावेळी “पत्रकार तिथे नव्हतेच” अशा वक्तव्याचा ‘अखिल महाराष्ट्र बहुजन पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीच्या वतीने कराड येथे जाहीर निषेध करण्यात आला.

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान उभ्या पावसात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. त्यावेळी पत्रकारही त्याठिकाणी उपस्थित होते, बहुजन पत्रकार संघाचेही सभासद असणारी पत्रकार मंडळीने या सभेला चांगलीच प्रसिद्धी दिलेली आहे. असे असताना राष्ट्रवादी पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी “पवारसाहेबांच्या’ या सभेला सातारा जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित नव्हते ते सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या कॅमेऱ्याने टिपले असल्याचे “खोडसाळपनाचे” वक्तव्य केलेले आहे.

ह्यामुळे पत्रकारांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे या खा.सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले, बैठक राज्य अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.यावेळी आबा सोनवले -पुणे,अश्विनी खलिपे -सांगली, राम कांबळे-उस्मानाबाद, पप्पू लांडगे-बीड, आबीद सोगावकर -रायगड,सुभाष कांबळे-कोल्हापूर, यशवंत वायदंडे, कोल्हापूर जिल्हा मकरंद साठे-माळशिरस सोलापूर, संपतराव मोहिते-कराड सातारा, संतोष भिंगारदेवे-सातारा, जब्बार मुजावर -कराड सातारा उपस्थित होते.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED