आनंद या जीवनाचा या भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

27

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.21फेब्रुवारी):-मराठी साहित्य मंच व साहित्य तारांगण समुहाचे समूह प्रशासक नंदकुमार शेंदरे सर (नंदकवी)यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी साहित्य मंच व साहित्य तारांगण समुहाच्या वतीने “आनंद या जीवनाचा” या विषयावर भव्य राज्यस्तरीय काव्यलेखनस्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत नवोदित व नामवंत कवी कवयित्री यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून या स्पर्धेला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त करून दिले.

स्पर्धा आयोजनात समूह प्रमुख सौ.शालू विनोद कृपाले(मोहतेज) समुह प्रमुख काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब),समूह प्रमुख नंदकुमार शेंदरे(नंदकवी),समूह संस्थापक अंगद दराडे यांनी महत्वपुर्ण भूमिका बजावली या भव्यदिव्य काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध कवयित्री सौ.उषा शिलवंत घोडेस्वार,भंडारा यांनी केले असून निकाल पुढील प्रमाणे- कविवर्य श्रीकांत म. शिरभाते यांची रचना सर्वोत्कृष्ट तर अच्युत मधुकर जठार यांची रचना उत्कृष्ट ठरली आहे.

प्रथम क्रमांकावर सौ. भाग्यश्री खुंटाळे,श्री. सुदत्त शंकर गोटेकर,सुनील रामचंद्र पवार,द्वितीय क्रमांक पटकवणारे सौ. उषा राऊत,सुनीता लोखंडे-घोडगे,कु. प्राप्ती यशवंत गोताड,तृतीय क्रमांकावर कु. दिपाली नि. मारोटकर,सौ. आनिला कैलास मुंगसे,मधुकर दुफारे,विशेष प्राविण्य प्राप्त रचनाआडबलववार पांडुरंग सरसमकर,सौ. रेवती साळुंके,स्वप्ना चौधरी, लक्षवेधी ठरलेल्या रचना कु.भावना गांधिले,सीमा भंडारे,श्री. अविनाश ठाकूर,उत्तेजनार्थ क्रमांक मिळवणाऱ्या रचनादत्तात्रय बापू लाड उर्फ मंगेश,गणेश पाटील,कु. छाया सुरेशराव बोहरूपी,सौ. रेखा बावा,अशोक बी. कांबळे या सर्व विजेत्या स्पर्धकांना व सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन डिजीटल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी सौ राजश्री वाणी मराठे यांचे विशेष सहकार्य लाभले.