शहराचे फुफ्फुस

27

पायाभूत विकासाच्या नावाखाली
शहराचे फुफ्फुस निकामी होतयं.
सिमेंट कॉक्रेटच्या जंगलापाई
हिरव्या वनांना मरण येतयं…..

नेते व भांडवलदारी नफ्यासाठी
सारे पृथ्वीला ओरबडून टाकतयं.
सिमेंटच्या माल संस्कृतीत
सूर्यकिरण आग ओकतयं…..

पर्यावरण संतुलनाच्या फसव्या घोषणा
भाषणात,कागदावर दिसतायं.
गरीब माणसांच्या मरणासाठी
सारे कौर्यजीवी वाट पाहतयं….

झाडांना जमीनदोस्त करून
अपार्टमेंटचे इमले चढतयं.
शहराचा खरा माणूसच
शहराबाहेर फेकला जातयं…

अव्वासव्वा रूपयाच्या बोलीने
नागपूर शेतीचा भाव करतायं.
सुपीक शेत जमीनीवर
फँल्टचे महाकाय गाळे चढतायं…

प्रदूषण विषारी वायूचा
ग्राफवर ग्राफ चढतोयं.
जैवविविधतेतील संतुलनाला
आपण सारे निकामी करतोय…..

नागवंशीय नागसरीतेला
पुन्हा प्रवाहित करूयं.
शहराच्या वनफुफ्फुसाला
सारे प्राणपणाने जपूयं…

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००