मुरूमगाव ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे एकहाती सत्ता

    38

    ✒️धानोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    धानोरा(दि.21फेब्रुवारी):- तालुक्यातील मुरूमगाव ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेस समर्पित शिवप्रसाद गवर्णा सरपंच पदी तर मथनुराम मलिया उपसरपंच पदी निवड झाल्याने नवनियुक्त सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे मुरूमगाव येथे भेट घेऊन हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.

    यावेळी मुरूमगाव येथे डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली, जिल्हा परीषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हा परीषद सदस्य विनोद लेनगुरे, नेताजी गावतुरे तालुकाध्यक्ष कॉ क गडचिरोली, अनिल कोठारे उपाध्यक्ष कॉ क गडचिरोली, बशीरभाई पिराणी, कुलदीप इंदुरकर उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी धानोरा, नवनियुक्त सरपंच संजय गावडे, प्रशांत कोराम अध्यक्ष युवक काँग्रेस धानोरा, बढई जी, जमलाल मार्गिया, योगेश कवाडकर, मडावी महाराज, टेकाम जी, शेवंता हलामी माजी सरपंच पन्नेमारा, मानकोबई उईके, अंजुषा बाई मैदनवार, चारूलता मार्गिया, गुलावबाई मार्गिया, किन्नाबाई भक्ता, अभिजित मेश्राम, कौशिक धूर्वे व ग्रामस्थ उपस्थित होते.

    डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली व मनोहर पाटील पोरेटी उपाध्यक्ष जिल्हा परीषद गडचिरोली यांनी नवनियुक्त सरपंच व उपसरपंच तसेच सदस्यांना चर्चेतून मार्गदर्शन केले.